March 14, 2026

जिल्हा परिषदेच्या स्पर्धातुन उत्तम कलाकार घडतील -मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

0
IMG-20251229-WA0055(1)

जिल्हा परिषदेच्या स्पर्धातुन उत्तम कलाकार घडतील -मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.

जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर ही कलानगरी आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. शिक्षण विभागाच्या सांस्कृतिक स्पर्धेतून कोल्हापूरच्या भूमीतून उत्तम कलाकार घडतील.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग आयोजित सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून कौशल्याला सुद्धा वाव मिळतो, या अशा स्पर्धातूनच भविष्यात चांगले कलाकार घडतील.कोतेल्हापूर जिल्हा हा शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात अव्वल असून कोल्हापूर जिल्ह्याच्या १००% सीसीटीव्हीनी युक्त शाळा उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली असून हा संपूर्ण जिल्ह्याचा बहुमान असल्याचे त्यांनी नमूद केले.जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जे जे स्पर्धक व मार्गदर्शक आलेले आहेत ते आपण सर्व आपण विजेते आहात.इथपर्यंत तुम्ही पोहोचलात हाच आपल्या कौशल्याचा विजय आहे,शाहू महाराजांच्या भूमीत मी काम करत असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शाहू स्मारक भवन येथे २ दिवस या स्पर्धा चालणार आहेत.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या स्पर्धा करत असतात. प्रत्येक वर्षी उत्साहाने संपन्न होणाऱ्या स्पर्धा म्हणजे नव्या पिढीतील कलाकार घडवणारी कार्यशाळाच आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धात्मक शिक्षणाबरोबरच सृजनशील कलागुणांचेही शिक्षण दिले जाते असे ते म्हणाले.
दरम्यान दिवसभरात मोठ्या गटातील समूहगीत, नाट्यीकरण, प्रश्नमंजुषा कथाकथन,प्रश्नमंजुषा या स्पर्धा संपन्न झाल्या.

यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी आर वाय ठोकळ, डॉ. विश्वास सुतार, श्रीमती रत्नप्रभा दबडे,प्रसाद पाटील तसेच परीक्षक महेश हिरेमठ, सिताराम जाधव, परशराम आंबी, संयोगीता महाजन,दिलीप पाटील, स्नेहल कुंभार, प्रभाकर लोखंडे,सरिता सुतार,मनीषा एकशिंगे,सुभाष मराठे,विजय देवणे, राजेंद्र धनवडे,संजय कडगावे, नेताजी फराकटे, स्पर्धा संयोजन समितीतील रवींद्र सुर्वे,दीपक जगदाळे, शाहू बनकर, विजय गारे, दिलीप चव्हाण राजेंद्र धनवडे,सदानंद शिंदे तसेच कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी केले.

चौकट-
सीसीटीव्ही उपक्रमाची प्रधानमंत्री यांच्याकडून दखल!
कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या १००% शाळात राबवलेल्या cctv उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन विशेष कौतुक केल्याचे कार्तिकेयन एस यांनी आवर्जून उल्लेख करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

(फोटो ओळी- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, व्यासपीठावर आर व्ही कांबळे, रत्नप्रभा दबडे, आर वाय ठोकळ, डॉ. विश्वास सुतार आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!