March 14, 2026

राजमाता जिजाऊ सहकारी संस्था सहकारात आदर्श निर्माण करेल- प्रा. अर्जुन आबिटकर पदार्पणातच ६० लाखाच्या ठेवी ‘राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे’ थाटात उद्घाटन

0
IMG-20251016-WA0048

राजमाता जिजाऊ सहकारी संस्था सहकारात आदर्श निर्माण करेल- प्रा. अर्जुन आबिटकर

पदार्पणातच ६० लाखाच्या ठेवी
‘राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे’ थाटात उद्घाटन

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्ह्याला सहकाराचे मोठे वलय आहे.विधायक केलेले काम लोक कधीच विसरत नाहीत.राजमाता गृहतारण पतसंस्थेने पदार्पणातच ६० लाखाच्या ठेवी संकलित करून दमदार सुरुवात केली आहे. भविष्यात ही संस्था सहकारात आदर्श निर्माण करेल., असे मत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर सर यांनी व्यक्त केले. ते निचितेनगर फुलेवाडी येथे राजमाता जिजाऊ गृहतारण सहकारी संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर मेडशिंगे तर प्रमुख उद्घाटक स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख होते.

आबिटकर म्हणाले, समर्पण भावनेने केलेलं कोणतही काम यशप्राप्त होते. नेहमीच विधायक विचार मनामध्ये ठेवून समाजामध्ये भावी पिढी घडवण्याचं पवित्र कार्य शिक्षकांच्या हातून घडते आहे. आज राज्यात काही पतसंस्था २००० कोटींच्या व्यवहार असणाऱ्या पतसंस्था आहेत,भविष्यात या संस्थेची वाटचाल सुध्दा त्या पद्धतीने होईल. संगणकीकृत प्रणालीमुळे आज कोणत्याही संस्थेत वॉकिंग बिझनेस कमी झाला असून संगणकीकृत प्रणालीमुळे सभासदांच्या एका क्लिकवर कारभार वेगाने करू शकतो.

प्रमुख उद्घाटक शारंगधर देशमुख म्हणाले,फुलेवाडी परिसरामध्ये बहुतांश शिक्षक वर्ग राहतो. समाजातील सर्व घटकांसाठी या संस्थेमध्ये आर्थिक व्यवहार करण्याची तरतूद केली आहे,याबद्दल त्यांनी चेअरमन संतोष गायकवाड यांचे अभिनंदन केले.मध्यमवर्गीय लोकांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. आपल्या उमेदीच्या काळात हे चांगले काम आपल्यातून घडते आहे. ठेव आणि कर्ज या स्वरूपात संस्था चांगल्या स्वरूपात वाटचाल करावी असेही ते म्हणाले.

शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील म्हणाले, आज जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या ६७ संस्था कार्यरत असून “राजमाता जिजाऊ संस्थेच्या” रूपाने ६८ व्या सहकारी संस्थेचा जन्म होतोय याचा मला आनंद होत आहे. “राजमाता जिजाऊ” या संस्थेच्या नावालाच शोभेल असा आदर्श या संस्थेकडून घालून दिला आहे. कारण आज जिल्ह्यातील इतर संस्थांमध्ये दोन महिला प्रतिनिधी असतात, पण या संस्थेमध्ये तब्बल चार महिलांना संधी देऊन ‘राजमाता जिजाऊ च्या विचारांचा जागर केला आहे.या संस्थेने घालून दिलेली महिलांच्या सन्मानाचा पायंडा इतर संस्थांना अनुकरणीय आहे. नव्या रक्ताला बळ देत असताना तरुणाई एकत्र येऊन नवं काहीतरी निर्माण करतेय हे सहकारी संस्थांसाठी भूषणावह आहे. राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या रूपाने युवा मंडळीच्या निर्मितीची ही सुरवात आहे. भविष्यामध्ये मी माझ्या आणि माझ्या संस्थांच्या रूपाने ठेवीच्या रूपात मदत देण्याचे आश्वासन देईन असे रोडे- पाटील म्हणाले.

प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक चेअरमन संतोष गायकवाड म्हणाले,समाजभान ठेवून शिक्षक आणि समाजातील सर्वच घटकांसाठी आर्थिक संस्था स्थापन करण्याची ध्येय गेल्या काही वर्षांपासून मनामध्ये होते., आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या माझ्या स्वप्नाला मूर्त रूप आले. आजवर माणसांचा जो माणसांचा गोतावळा जोडला, त्याची पोचपावती मला या संस्था स्थापनेच्या क्षणी आली. तब्बल संस्था स्थापनेच्या पहिल्याच दिवशी ६० लाखांची ठेव संकलित करण्याचे मोठे ध्येय आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे पूर्णत्वास जात आहे. भविष्यामध्ये सभासदाभिमुख कारभार करून संस्थेची आर्थिक वृद्धी आणि संस्थेला नावलौकिक प्राप्त करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे म्हणाले,संतोष गायकवाड यांची धडपड आणि समाजासाठी काहीतरी नवं निर्माण करण्याची क्षमता आहे. अत्यंत विनम्र आणि सचोटीचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी समाजामध्ये अनेक माणसं जोडली आहेत. यामुळे या सहकारी संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेली मंडळी आणि ठेव स्वरूपात संकलन झालेली रक्कम यावरूनच गायकवाड यांच्या समूहाच्या क्रियाशीलतेचे दर्शन घडते. संस्थेच्या प्रगतीसाठी जे जे लागेल ते ते सर्व देण्याचा शब्द मेडशिंगे यांनी दिला.

यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांचे मनोगत झाले.

यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रवींद्र केदार, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त बाबुराव निकम यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा बँकेचे शाखाधिकारी चंद्रकांत कामत, उपशिक्षणाधिकारी रविंद्र चौगुले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी समरजीत पाटील,गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी डी ए पाटील, प्रकाश आंग्रे, सेवानिवृत्त सहकार अधिकारी सदाशिव चौगुले, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील, व्हा चेअरमन सुरेश कोळी,शिक्षक बँक संचालक सुनील एडके, बाबु परीट, अमर वरुटे, गजानन कांबळे, धनाजी पाटील,तानाजी मेढे,वर्षा केनवडे,पद्मजा मेढे, दीपाली भोईटे,शुभांगी माळी, बाळासाहेब कांबळे शिक्षक बँकेचे तज्ञ संचालक आनंदा कांबळे,जुनी पेंशन चे सरचिटणीस विजय रामाने,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,प्रमोद पाटील,रमेश मेडेवाड, पुरोगामी महिला राज्य उपाध्यक्ष प्रमिला माने, समितीचे सरचिटणीस प्रभाकर कमळकर, सुनील चौगुले, जुनी पेंशन चे दिलीप वाळवेकर, प्रकाश भोसले,सुनील सुतार,युवराज पाटील,तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी, सर्व शिलेदार पाहुणे मंडळी, नातेवाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व्हा.चेअरमन अनिल चौगुले(कदम), नीलम गायकवाड, सूत्रसंचालन बाबुराव निकम, राहुल पाटील यांनी तर आभार आनंदा बनकर यांनी मानले.

कार्यक्रमास करवीर जुनी पेन्शन संघटनेच्या महिला अध्यक्ष स्नेहा माळी,संगीता अलगौडर,अनुराधा वळसंगकर, अनिता गवळी, शितल पाटील तसेच संस्थापक व्हा. चेअरमन अनिल चौगुले(कदम),राजमाता संस्थेचे संस्थापक संचालक :
सचिन हजारे,बाबुराव निकम,शरद गुरव, चेतन शिंदे, नितीन कांबळे,निलेश कारंडे, लक्ष्मण घावटे,मारुती फाळके,शशिकांत बेडकिहाळे,आरती पोवार, संगिता अलगौंडर,जैनब शेख,दिपाली कतगर,
सचिव सौ. माधुरी सुतार व सर्व राजमाता जिजाऊ परिवार उपस्थित होता.

चौकट-१
शारंगधर देशमुख यांची ५ लाखांची ठेव.

शारंगधर देशमुख यांनी स्वतःच्या संस्थेची पाच लाखाची ठेव ‘ठेव’ स्वरूपात देण्याचे जाहीर करून या नवीन सहकारी संस्थेला बळ देणारी प्रत्यक्ष कृती करून आपल्या सामाजिक बांधिलकी चा प्रत्यय दिला.

 

चौकट-२
संस्थेचे हायटेक कार्यालय.. हायटेक व्यवहार!
संस्थेने पदार्पणातच निचितेनगर येथे संगणकीकृत, सर्व सोयीसुविधानियुक्त कार्यालय निर्माण केले असून पदार्पणातच संस्थेच्या ६० लाखाच्या ठेवी संकलित करून दमदार सुरुवात केली आहे, संस्थेच्या या एन्ट्रीमुळे’ मान्यवर व उपस्थितांनी कौतुक केले.

फोटो ओळी-१.राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना प्रा. अर्जुन आबिटकर, व्यासपीठावर शारंगधर देशमुख, शिवाजी रोडे पाटील, दिगंबर मेडशिंगे, चंद्रकांत कामत,मंगेश धनवडे, अमर वरुटे, रवींद्रनाथ चौगुले, समरजीत पाटील, डी ए पाटील, विश्वास सुतार आदी.)

फोटो ओळी-२.
पदार्पणातच संस्थेच्या ६० लाख ठेवींच्या डिजिटल धनादेशप्रतीचे अनावरण करताना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!