March 14, 2026

करवीर ता. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब कांबळे,व्हा.चेअरमनपदी दिपाली भोईटे

0
IMG-20251015-WA0014

करवीर ता. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब कांबळे,व्हा. चेअरमनपदी दिपाली भोईटे

कोल्हापूर/प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची एक महत्त्वाची आर्थिक शिखर संस्था असणाऱ्या करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब कांबळे यांची नव्याने तर व्हा. चेअरमनपदी दिपाली भोईटे यांची फेरनिवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी एस आर पोवार,व एस एस अडसूळ ,शिक्षक नेते आ. कृष्णात कारंडे शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन सुरेश कोळी सर, शिक्षक बँक संचालिका वर्षा केनवडे प्रमुख उपस्थित होते.

निवड सभेनंतर नूतन चेअरमन बाळासाहेब कांबळे म्हणाले, “संस्थेतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व शिक्षक सभासदांच्या पाठबळामुळे चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळत आहे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी व सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”

नूतन व्हा. चेअरमन दिपाली भोईटे म्हणाल्या, “संस्थेतील ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींनी पुन्हा व्हा.चेअरमन म्हणून काम करण्याची संधी देऊन विश्वास दाखवला याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करते. माझ्या कार्यकाळात संस्थेची आर्थिक उन्नती व सभासदांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”

यावेळी ल. रा. हजारे पतसंस्थेचे चेअरमन शरद केनवडे ,जेष्ठ मार्गदर्शक आनंदराव शिंदे, तालुका अध्यक्ष गजानन मोरे, सरचिटणीस बाबा धुमाळ हरिदास वर्णे तसेच
संस्थेचे संचालक यशवंत चौगले, सुकुमार मानकर, धनाजी पाटील, धनाजी सासणे, शशिकांत धुत्रे, राजेंद्र तौंदकर, प्रताप पाटील, दिपक पाटील, गीता कोळी, शबीर आवटी, सचिन पावसकर
संस्था सचिव संदिप शिंदे,प्रमोद कारंडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!