March 14, 2026

करवीर तालुका प्राथ. शिक्षक पतसंस्थेच्यावतीने सभासदांना दीपावली निमित्त भेट वस्तू वाटप

0
IMG-20251015-WA0010

करवीर तालुका प्राथ. शिक्षक पतसंस्थेच्यावतीने सभासदांना दीपावली निमित्त भेट वस्तू वाटप

कोल्हापूर/मारुती फाळके

करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावली निमित्त भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव शिंदे (गुरुजी) होते.

शिक्षक नेते कृष्णात कारंडे, शिक्षक बँक व्हा. चेअरमन सुरेश कोळी, महिला राज्याध्यक्ष सौ.
वर्षा केनवडे हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सभासदांना किर्ती गोल्ड खाद्यतेल पाच लिटर, ब्लॅकेट भेटवस्तू स्वरूपात देण्यात आल्या. तर शेअर्स रक्कमेवर पाच टक्के रोख रक्कमही देण्यात आल्याचे चेअरमन बाळासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. व्हा.चेअरमन सौ. दिपाली भोईटे आभार मानले.

यावेळी संचालक यशवंत चौगले, सुकुमार मानकर, धनाजी पाटील, धनाजी सासणे, शशिकांत धुत्रे, राजेंद्र तौंदकर, प्रताप पाटील, दिपक पाटील, सचिन पावसकर, सौ गीता कोळी, शरद केनवडे,हरिदास वर्णे,शब्बीर आवटी,सदानंद शिंदे, सचिव संदीप शिंदे,प्रसेनजीत कारंडे कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो ओळी-कोल्हापूर : येथील करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावली निमित्त भेटवस्तू वाटप करताना शिक्षक नेते कृष्णात कारंडे, सुरेश कोळी, वर्षा केनवडे, बाळासाहेब कांबळे, दिपाली भोईटे व इतर मान्यवर.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!