March 14, 2026

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची टीईटी बाबत पुनर्विचार याचिका अखेर बोर्डावर-मंगेश धनवडे

0
IMG-20251014-WA0056

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची टीईटी बाबत पुनर्विचार याचिका अखेर बोर्डावर -जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे

 न्यायालयीन लढा तीव्र करणार- राजाध्यक्ष वितेश खांडेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी

मागील अनेक दिवसांपासून शिक्षकांना परत एकदा टीईटी द्यावी लागणार अशा बातम्या समाज माध्यमातून फिरताना दिसत आहेत. टीईटीच्या या बातम्या मुळे अनेक शिक्षक बांधव मानसिक तणावामध्ये आहेत. यातच सिंधुदुर्ग मधील एका शिक्षक बांधवांनी स्वतःचे जीवन देखील संपवले. यावर तातडीची पावले उचलत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुढे सरसावली आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,राज्य सरचिटणीस गोविंद उगले,राज्यकार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, प्राजक्त झावरे, राज्य सल्लागार सुनीलदुधे,मीडिया प्रमुख विनायक चौथे, यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी टीईटी संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रियेची तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

यामध्ये पदवीधर आमदार एडवोकेट अभिजीत दादा वंजारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली व याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे रिव्ह्यू पिटिशन म्हणजेच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात संघटनेला यश मिळाले आहे सदर पिटीशन चा केस डायरी नंबर 59344/2025 असा आहे.

चौकट-१
कोणीही मानसिक तणावांमध्ये येऊन कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये-

याद्वारे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे समस्त राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की कोणीही टीईटी संदर्भात कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण घेऊ नये मग कोणतीही टोकाचे पाऊल उचलू नये.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना खंबीरपणे आपल्या सर्वांसोबत आहे.टीईटी रद्द साठी न्यायालयीन लढा तीव्र करणार-
वितेश खांडेकर
-राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना

चौकट-२

रस्त्यावरील लढाईची  जुनी पेंशन संघटनेची तयारी -मंगेश धनवडे

सारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयामुळे जरी शिक्षकांवर मानसिक दडपण असले तरीही संघटना शिक्षकांसोबत सातत्याने ठामपणे उभी आहे. न्याय मिळेपर्यंत न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील लढाईची तयारी देखील संघटनेची आहे.
मंगेश धनवडे
–जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूर
(फोटो -मंगेश धनवडे जिल्हाध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!