राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे आज उद्घाटन-संतोष गायकवाड
राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे आज उद्घाटन-संतोष गायकवाड
प्रा.अर्जुन आबीटकर व शारंगधर देशमुख या मान्यवरांची उपस्थिती
कोल्हापूर/प्रतिनिधी
“विश्वासाचे एक पाऊल सहकारातून सेवेकडे” ही ब्रीद घेऊन निचितेनगर जुना फुलेवाडी रिंग रोड येथे राजमाता जिजाऊ सहकारी गृहतारण पतसंस्थेची स्थापना संस्थेचे उद्घाटन आज १४ ऑक्टोंबर रोजी सायं. सहा वाजता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर व सभापती शारंगधर देशमुख यांच्या हस्ते होत असून शिक्षक-समाजातील इतर घटकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन संतोष गायकवाड यांनी दिली.
सहकारामुळे कुटुंबांची प्रगती होते, कुटुंबे उभी राहतात आणि त्यातूनच आर्थिक गरजा पूर्ण होतात,मानवी जीवनाच्या सुखाच्या आशा पल्लवित होतात हेच तत्व डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी विधायक पाऊल टाकत स्वतःची एक वेगळी पाऊलवाट निर्माण केली आहे.
तयारीच्या अगदी कमी कालावधीमध्ये या संस्थेची स्थापना होत असून संस्थेचे सर्व सोयी सुविधांनी युक्त, अत्याधुनिक कार्यालय निचितेनगर फुलेवाडी कोल्हापूर येथे साकारले आहे. शिक्षक,समाजातील इतर घटक यांनी सभासद नोंदणी करून,ठेव व कर्जरुपात संस्थेच्या कार्यात हातभार लावावा, व उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यावेळी संस्थापक व्हा. चेअरमन अनिल चौगुले(कदम),
संस्थापक संचालक :
सचिन हजारे,बाबुराव निकम,शरद गुरव, चेतन शिंदे, नितीन कांबळे,निलेश कारंडे, लक्ष्मण घावटे,मारुती फाळके,शशिकांत बेडकिहाळे,आरती पोवार, संगिता अलगौंडर,जैनब शेख,दिपाली कतगर,
सचिव सौ. माधुरी सुतार
व सर्व राजमाता जिजाऊ परिवार उपस्थित होता.
चौकट-
“राजमाता जिजाऊ सहकाराचे” रोपटे वाढवण्यासाठी समाजाने पाठबळ द्यावे- संतोष गायकवाड
आर्थिक गरज ही प्रत्येकाची निकड असणारी बाब आहे. ‘सहकारातून आर्थिक स्वयंपूर्णता’ साधता येते. हा सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षक बांधव आणि समाजात इतर घटकांसाठी गृहकर्ज आणि इतर कारणांसाठी सहजरीत्या आर्थिक स्रोत उपलब्ध व्हावा आणि समाजामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण व्हावी, या उद्देशाने करवीरच्या पावन भूमीत असंख्य मित्रपरिवाराच्या आशीर्वादाने “राजमाता जिजाऊ गृहतारण” पतसंस्थेची स्थापना करत आहोत. एक विधायक विचार डोळ्यासमोर ठेवून या सहकार संस्थेचे रोपटे लावत आहे. शिक्षक बांधव आणि समाजातील इतर घटकांनी संस्थेच्या आर्थिक वृद्धीसाठी पाठबळ व आशीर्वाद द्यावेत.
-संतोष गायकवाड
संस्थापक चेअरमन
राजमाता जिजाऊ सहकारी पतसंस्था कोल्हापूर.










