आरोपीला फाशीची शिक्षा द्या : राजेंद्र कोरे
आरोपीला फाशीची शिक्षा द्या : राजेंद्र कोरे
कोल्हापूर/प्रतिनिधी
बदलापूर या ठिकाणी दोन चिमूरड्या मुलींवर शाळेतील शाळेतील सफाई कामगार नराधमाने केलेल्या अत्याचाराचा महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत असून या घटनेतील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई बदलापूर येथील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने दोन छोट्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या निषेधार्थ आज बदलापूर बंद करण्यात आले. शाळेतील पालकांनी शाळा व पोलीस प्रशासनाला घेराव घातला. रेल्वे बंद आंदोलन केले. पालकांच्या तीव्र भावना यांचा विचार करता फास्टट्रॅक आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महासंघाच्या वतीने केली आहे.










