March 24, 2026

भेडसगाव नागरी पतसंस्थेला २कोटी २ लाखांचा नफा : हंबीरराव पाटील

0
IMG-20240825-WA0037

भेडसगाव नागरी पतसंस्थेला २कोटी २ लाखांचा नफा : हंबीरराव पाटील- भेडसगावकर

२७५ कोटी व्यवसाय करणारी महाराष्ट्रातील नामांकित संस्था

३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

भेडसगाव/मारुती फाळके

ग्राहकांच्या मनात पारदर्शी व विश्वासार्ह कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केलेली सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार प्राप्त, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे यशस्वी वाटचाल करत ओळख निर्माण केलेल्या भेडसगाव नागरी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात निव्वळ नफा दोन कोटी दोन लाख इतका झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील भेडसगावकर यांनी दिली. ते संस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

ते म्हणाले, संस्थेकडे सध्या मार्च २०२४ अखेर भाग भांडवल व निधी १७ कोटी ४२लाख
असून गतवर्षीच्या तुलनेत या ठेवीमध्ये १५.२५% वाढ होऊन एकूण ठेवी १६० कोटी १४ लाख इतक्या झाल्या आहेत. तसेच कर्ज वाटपामध्ये १९.४८% वाढवून १०५ कोटी ६८ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेने सध्या ९७.९८% कर्ज वसुली केली असून संस्थेचा नेट एनपीए १.९८% इतका राखण्यात यश मिळवले आहे.

संस्थेच्या व्यवसायामध्ये १६.०४% नी वाढ होऊन मिश्र व्यवसाय २६५ कोटी ८२ लाखापर्यंत पोहोचला आहे. तसेच संस्थेने एकूण ठेवीच्या ४५.१८% म्हणजे ६७ कोटी ५४ लाख इतकी गुंतवणूक केली आहे.
संस्थेच्या एकूण ठेवी १६०.१५ कोटी असून रोख व बँक शिल्लक ५.०५ कोटी,बँकेतील गुंतवणूक ६७.५४ कोटी,ठेवतारण कर्जे ४.२७ कोटी,सोने तारण कर्जे ३७.३१ कोटी अशी एकत्रित रक्कम ११४.१७ कोटी असून त्याचे संस्थेच्या ठेवीशी प्रमाण ७१.३५% आहे.
सध्या सहकारात वॉकिंग बिझनेस कमी झाला असून ई व्यवहाराकडे लोकांचा कल वाढला आहे,तरुण पिढीचा संस्थेच्या व्यवहारात सहभाग करून आर्थिक वृद्धी करणे हे आगामी काळातील सहकाराचे आव्हान आहे.,संस्थानी राष्ट्रीयीकृत बँकेच्या पुढे एक पाऊल टाकून आपला कारभार चालवायला हवा.मुंबई शहरात सध्या ५ शाखा चालू केल्या असून इथेही पुर्णतः ऑनलाइन प्रणाली अवलंबली आहे,ऑनलाईन कर्जवसुली ला याचा फायदा होत आहे.
संस्था सध्या सक्षम स्थितीत असून सभासदांच्या अडचणीच्या काळात संस्थेतील कर्ज व इतर योजनांचा सभासदांना फायदा होत आहे.या वर्षात संस्था १०% डिव्हिडंड वाटप करणार असून लवकरच संस्थेच्या प्रधान कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यवसाय वाढीची ध्येय धोरणे निश्चित करून वर्षभर वसुली यंत्रणा गतिमान करून नियोजन आणि सातत्यपूर्ण कामामुळे थकबाकी २.६१% व नेट एनपीए १.९८ टक्के राखण्यात यश मिळवले आहे. यावेळी त्यांनी संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या ठेवीदार, कर्जदार, सभासदांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

 

संस्थेमार्फत मयत सभासदांच्या वारसांना मदत, कर्जदार साहाय्य योजना,आजारी सभासदांना मदत निधी, कर्मचारी व सभासद यांचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांना दहा लाखाचे विमा संरक्षण,वीज बिल भरणा,ऊस बिले इत्यादी सेवा सुविधा पुरवल्या जातात.संस्थेच्या कार्याची व प्रगतीची दखल घेऊन शासनाने संस्थेला सहकार विभागामार्फत देण्यात येणारा ‘सहकारातील मानबिंदू’ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पाऊले गतिमान करत संस्थेने आरटीजीएस, एनएफटी, मोबाईल अँप, एसएमएस सुविधा उपलब्ध केल्या आहेत. संस्थेला सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कार्यक्षेत्र दर्जा मिळाला असून अत्याधुनिक सेवा पुरवत २१ शाखांद्वारे महाराष्ट्रात ग्राहकांना सेवा देण्याचे काम संस्था करीत आहे. पुढील आर्थिक वर्षाअखेर १६० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून २६५ कोटींचा मिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे भविष्यात संस्था ३०० कोटी व्यवसाय करण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.

युवा नेते अमरसिंह पाटील
म्हणाले,येत्या मार्चपर्यंत २०० कोटी ठेवीचा टप्पा पार करण्यासाठी कर्मचारी सभासद यांनी उद्दिष्ट ठेवावे.,३०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था म्हणून संस्था प्रगतीपथावर आहे. सध्या संस्थेच्या अद्यावत संगणकीकृत २१ शाखा असून मुदत ठेव,लखपती ठेव योजना,धनसंचय योजना अशा अभिनव योजना सुरू करण्यात आल्या आहेत.सामान्य सभासद अंतिम मानून राजकारण विरहित सहकार हिताचेच काम संस्थेत चालते.ग्राहकांनी संस्थेचा कार्यविस्तार लक्षात घेऊन जास्तीत जास्त ठेवी संकलनासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आप्पासो साळुंखे, शंकर रावण,बाळासो पाटील यांची भाषणे झाली.

सभेस व्हा. चेअरमन पांडुरंग डांगे, प्रथम लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील, संग्राम पाटील, संस्थेचे जनरल मॅनेजर संजय पाटील,
संचालक मंडळ-आप्पाजी पाटील,विठ्ठल पाटील,बाळकृष्ण पाटील,महादेव बुवा, विलास यादव,अशोक आडसुर,राजेंद्र कुसळे, इंदुबाई पाटील,नंदाताई पाटील,शिवाजी पाटील,के डी चौगुले, भारत प्रभावळे, अमर पाटील,गणपती पाटील,बाबुराव पाटील,आबा घाटगे,सुनील उर्फ दाजी पाटील,रामचंद्र नाईक,रवींद्र पाटील,संजय परीट, सचिन वाकडे, लक्ष्मण पाटील,शिवाजी पाटील,आनंदा रावण,विलास हारूगडे,दगडू कदम,
संस्थेचे विभागीय अधिकारी बाबासो चौगुले, दीपक पाटील,दत्ता पाटील,बाबासो नाईक,विश्वास पाटील,गोविंद पाटील,युवराज पाटील संजय हारुगडे,वसुली अधिकारी भारत माईंगडे, एस के पाटील,नारायण हारूगडे,कृष्णदेव चौगले,तसेच संस्थेचे सभासद नरेंद्र गायकवाड, सागर पाटील,प्रवीण पाटील,अजित पाटील,संभाजी किटे, सुरेश पाटील आदी सभासद,गुणवंत पाल्यांचे पालक उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक एन टी पाटील,अहवालवाचन संजय पाटील,सूत्रसंचालन संपत कोकाटे तर आभार कृष्णदेव चौगुले यांनी मानले.
सभेस सभासद,पाल्य,ग्रामस्थ, विविध गावचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-
गुणवंतांना शाबासकी!

सभेत सभासदांचे गुणवंत पाल्य, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी,स्पर्धा परीक्षेत यशस्वी,विविध क्षेत्रांतील प्राविन्यप्राप्त खेळाडू,उत्कृष्ट पिग्मी एजंट,आदर्श कर्मचारी अशा तब्बल ५०च्या वर गुणिजनांचा संस्थेमार्फत रोख रक्कम,शिल्ड देऊन सन्मान करण्यात आला.

चौकट-
कर्जदार साहाय्य योजनेचा आधार
संस्थेने सुरू केलेल्या ‘कर्जदार साहाय्य योजनेमुळे तब्बल १५ सभासद कर्जदारांचे १० लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली.या योजनेसारख्या मेडिक्लेम, धनसंचय अशा अनेक सभासदहिताच्या योजना संस्था राबवत असल्याचे संस्थापक हंबीरराव पाटील यांनी सांगताच सभागृहाने टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

(फोटो ओळी)
भेडसगाव नागरी पतसंस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील-भेडसगावकर, सोबत युवा नेते अमरसिंह पाटील, संग्राम पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग डांगे व सर्व संचालक मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!