करवीर शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्था ‘सभासदांभिमुख’ – सतेज पाटील
करवीर शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्था ‘सभासदांभिमुख’ – सतेज पाटील
करवीर तालुका शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
सभासदांभिमुख कारभार करणारी नामांकित संस्था
कोल्हापूर/मारुती फाळके
शिक्षकांच्या मनात पारदर्शी व विश्वासार्ह कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केलेली शिक्षक सहकार संस्थातील आदर्श निर्माण केलेली करवीर तालुका शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्था ‘सभासदाभिमुख’ असून या संस्थेचा कारभार सहकाराला पुढे नेणारा आहे. अशा संस्थामुळेच सभासदांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होते. अशा सातत्यपूर्ण कारभारामुळे संस्थेचा विस्तार व आर्थिक वृद्धी वृद्धिंगत होणार असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी केले. ते संस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
ते म्हणाले, सहकार संस्था या प्रत्येकाच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करतात. १% मार्जिन मध्ये सभासद हिताचा कारभार करणाऱ्या या संस्थेच्या संचालक मंडळ व सुकाणू समितीचा आदर्श आहे.शिक्षक नेते राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले.
शैक्षणिक घडामोडी बद्दल भाष्य करताना ते म्हणाले,
राज्यात मोठ्या संख्येने शाळांना मंजुरी दिली आहे. सध्या विद्यार्थी संख्या कमी होत आहे व शाळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत. यापुढे राज्यात नवीन शाळांना परवानगी देताना शासनाने आता धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे.महाविकास आघाडीचा जाहीरनाम्यात संघटनांनी सर्वसमावेशक ५ मुद्दे सुचवावेत त्याचा उल्लेख जाहीरनाम्यात करता येईल.
करवीर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा व गुण गौरव सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.फुलेवाडी येथील पांडुरंग माने हॉलमध्ये कार्यक्रम झाला.
सतेज पाटील म्हणाले,शिक्षकांनी कायम संघटित राहावे, लोकशाहीत संघटित ताकद महत्त्वाची असते.संघटनामुळेच विविध प्रश्न मार्गी लागतात. सत्ता कोणाची असो,लोकशाही टिकली पाहिजे. सामान्यांसाठी लोकशाही व्यवस्था महत्त्वाची आहे. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शिक्षक नेते राजाराम वरुटे म्हणाले, शिक्षकांसह सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन नको आहे,जुनी पेन्शन योजनाच हवी.संचमान्यतेच्या नवीन आदेशात विद्यार्थी पटसंख्या वाढवली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होतील व प्राथमिक शाळा बंद पडतील. त्यामुळे हा नवीन आदेश रद्द व्हावा.नगरपालिका महानगरपालिका शाळेतील शिक्षकांचे पगार शासनामार्फत व्हावेत.
संस्थेचे चेअरमन मारुती दिंडे म्हणाले,
संस्था सध्या भक्कम स्थितीत असून सभासदांच्या अडचणीच्या काळात संस्थेतील कर्ज व इतर योजनांचा सभासदांना फायदा होत आहे.या वर्षात संस्था १५% डिव्हिडंड वाटप करणार असून संस्थेला या आर्थिक वर्षात १४,३१,०७७ रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेचे सध्याचे भाग भांडवल ६८,३२,६४० असून ठेवी २१,०९,५८,३०४ आहेत, कर्ज वाटप २०,३४,८४,०९९ इतके केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, संभाजी बापट,बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार,श्रीकांत चव्हाण, सात्ताप्पा चौगुले, श्वेता खांडेकर यांची भाषणे झाली.
यावेळी सुकाणू समितीचे बाजीराव लगारे,शामराव जाधव, शंकर भोई,एस.एन. पाटील, बाजीराव पाटील,राजाराम शिर्के,शब्बीर मुजावर, अशोक संकपाळ,आनंदा बेडेकर,के एल खाडे, बाळासो चौगुले,एस एन पाटील
संचालक दत्तात्रय एकशिंगे, संभाजी पाटील ,बाजीराव पाटील,संतोष कांदळकर, धोंडीराम पाटील,प्रकाश निकम ,विजय मालाधारी,डी.एस. पाटील,ज्योत्स्ना महात्मे, वर्षा सनगर, नूरजहा मुलाणी,तज्ञ संचालक भिवाजी लोखंडे, नामदेव पाटील तसेच शिक्षक संघाचे जिल्हा तालुका कार्यकारिणी नवनाथ व्हरकट, विष्णू फाळके,आर जी जाधव, सर्जेराव सुतार,विजय केंद्रे, आर जी कांबळे, संदीप पाडळकर, भीमराव देशमुख,नसीम मुल्ला,लता नायकवडे, रुपाली पाटील,मनीषा एकशिंगे,अश्विनी परीट,उपस्थित होते.
सभेचे स्वागत संभाजी पाटील प्रास्ताविक मारुती दिंडे,अहवालवाचन सचिव अमोल लगारे,सूत्रसंचालन सादिया मुजावर, श्रीकांत वेदांते तर आभार अनिल कंगणे यांनी मानले.
सभेस शिक्षक सभासद,संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी-
कोल्हापूर :करवीर पतसंस्थेच्या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील,व्यासपीठावर शिक्षक नेते राजाराम वरूटे , माजी नगरसेवक राहुल माने, संभाजी बापट मारुती दिंडे,प्रशांत पोतदार,बाजीराव कांबळे, श्रीकांत चव्हाण, शंकर भोई,बाजीराव लगारे,आनंदा बेडेकर आदी.
चौकट-
गुणवंतांना शाबासकी!
सभेत सेवानिवृत्त शिक्षक,सभासदांचे गुणवंत पाल्य, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी,स्पर्धा परीक्षेत यशस्वी,विविध क्षेत्रांतील प्रावीन्यप्राप्त विद्यार्थी, मार्गदर्शक,नूतन मुख्याध्यापक, नवनियुक्त शिक्षक, जिल्हा बदली शिक्षक अशा तब्बल ७० च्या वर गुणिजनांचा संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला.
चौकट-
संस्थेचे सभासद हिताचे निर्णय..
संस्थेचे सध्या ४४३ सभासद असून,बाहेरच्या तालुक्यातील शिक्षक कर्मचारी सभासद होण्यासाठी इच्छुक आहेत, यासाठी संस्थेचे इतर तालुक्यात कार्यक्षेत्र वाढवण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
संस्था सध्या ९ % व्याज दराने कर्ज वाटप करते.या संपूर्ण कर्जाचा भारतीय जीवन बिमा निगम कडून इन्शुरन्स केला जातो,केवळ १% मार्जिन मध्ये संस्थेचा कारभार केला जातो,सभासद कल्याण निधी,दिवाळी भेट,दरवर्षी डिव्हिडंड मध्ये वाढ अशा अनेक सभासदहिताच्या योजना संस्था राबवत असल्याचे चेअरमन मारुती दिंडे यांनी सांगताच सभागृहाने टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले व सर्व संचालक मंडळाचा सत्कार केला.










