March 24, 2026

केडीसीसी गृहतारण’ च्या लवकरच तीन नवीन शाखा -संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे

0
IMG-20240901-WA0080(1)

केडीसीसी गृहतारण’ च्या लवकरच तीन नवीन शाखा -संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

कोल्हापूर टाइम्स24 प्रतिनिधी:

केडीसीसी गृहतारण’ च्या लवकरच नवीन  तीन ठिकाणी  शाखा सुरू करत असल्याचे केडीसीसी गृहतारण’ चे संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे यांनी सांगितले ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. 

कोल्हापूर ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. संस्थेच्या पाचव्या सर्वसाधारण सभेत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे म्हणाले, ‘ संस्थेने गेल्या चार वर्षात नेत्रदीपक प्रगती साधली असून १४६ कोटीची उलाढाल केली आहे. गेल्या आर्थिक वर्षेत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. संस्थेतर्फे सोने तारण दहा टक्के दराने कर्ज उपलब्ध दिले जाते. सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे ठेवीचा ओघ वाढला आहे. लवकरच तीस कोटींचा टप्पा पार करीत आहे. नजीकच्या काळात तीन शाखा विस्तार करण्यात येणार आहे. अत्याधुनिक लॉकर सुविधा ८०० लॉकर्स उपलब्ध करून देत आहोत. लोकांचा विश्वास सेवकांचे योगदान सभासदांचे हित यामुळे संस्थेकडे अ आणि ब वर्ग मिळून सभासद ६५३८ आहेत.

याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, वेतन पथक अधीक्षक वसुंधरा कदम, करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दिपाली भोईटे यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक, नव नियुक्त मुख्याध्यपाक, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक, विविध क्षेत्रात प्रविण्य संपादन केलेले शिक्षकांचा शाल बुके देवून सत्कार करण्यात आला.

संस्थेचे व्यवस्थापक मनोहर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतुपूर्ण कांबळे यांनी बँकेची कार्यपद्धती, सेवासुविधांची माहिती दिली. उपशिक्षण अधिकारी शंकर यादव यांनी संस्थापक चेअरमन सुरेश कांबळे हे सर्व क्षेत्रात झोकून देवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. कमी कालावधीत संस्थेने यश संपादन केले आहे. नजीकच्या काळात ही संस्था निश्चित नावालौकिक प्राप्त करेल असे नमूद केले.

याप्रसंगी करवीर पतसंस्थेच्या चेअरमन भोईटे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक नवनाथ व्हरकट यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे व्हाईस चेअरमन कपिल पोवार, स्वप्नपूर्ती पतसंस्थेचेचे चेअरमन अनिल सरक, संस्थेचे संचालक, केंद्रप्रमुख, शिक्षक सभासद व ग्राहकांची उपस्थिती होती. आनंदा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक एम. एस चव्हाण यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!