प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे
प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे
कोल्हापूर/मारुती फाळके
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते सुरेश कोळी तर उपाध्यक्षपदी शिक्षक संघ(थोरात गटाच्या) पद्मजा मेढे यांची निवड करण्यात आली.
बँकेच्या संचालक मंडळाची आज मंगळवारी १५ एप्रिल रोजी बैठक झाली. यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. मेढे यांची दुसऱ्यांदा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सहाय्यक निबंधक सी.एम. इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. नूतन अध्यक्ष कोळी व उपाध्यक्ष मेढे हे दोघेही पदाधिकारी करवीर तालुक्यातील आहेत. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान अध्यक्षपदासाठी कोळी यांचे नाव संचालक शिवाजी बोलके यांनी सुचवले तर संचालक नंदकुमार वाईंगडे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी मेढे यांचे नाव संचालक बाळासाहेब निंबाळकर यांनी सुचवले तर संचालक अमर वरुटे यांनी त्यास अनुमोदन दिले. बैठकीस मावळते अध्यक्ष बाळकृष्ण हळदकर, उपाध्यक्ष रामदास झेंडे, संचालक राजेंद्र पाटील, अर्जुन पाटील, सुनील एडके, एस व्ही पाटील, शिवाजी रोडे -पाटील, गौतम वर्धन, गजानन कांबळे, बाबू परीट, वर्षा केनवडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या निमित्ताने सुकाणू समितीचे ज्योतीराम पाटील, रवीकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, कृष्णात कारंडे, रघुनाथ खोत, बी.एस. पोवार, प्रकाश खोत, संजय कुर्डुकर आदी उपस्थित होते.
चौकट-१
सभासद हिताला प्राधान्य
बँकेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो. या संधीचा बॅकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन, अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार अधिक गतिमान होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी व संचालक मंडळ कार्यरत असेल.
——– मा.सुरेश कोळी
नूतन चेअरमन
चौकट-२
बँकेच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्नशील
शिक्षक बँक संचालकपदाच्या कार्यकाळामध्ये दुसऱ्यांदा मला व्हाईस चेअरमनपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करणार असून बँकेमध्ये महिला सभासद संख्या वाढवण्याबरोबरच सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध राहीन.बँकेच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
-–—– पद्मजा मेढे
नूतन व्हा. चेअरमन










