शिक्षक समितीने नेहमीच शिक्षकांच्या पाठीवर थाप टाकण्याचे काम केले- आमदार अशोकराव माने हातकणंगले ता. शिक्षक समितीचे पुरस्कार वितरण दिमाखात
शिक्षक समितीने नेहमीच शिक्षकांच्या पाठीवर थाप टाकण्याचे काम केले- आमदार अशोकराव माने
हातकणंगले ता. शिक्षक समितीचे पुरस्कार वितरण दिमाखात
हातकणंगले/मारुती फाळके
गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुक,प्रेरणा व प्रोत्साहनाची थाप टाकण्याचे काम नेहमीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले असून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारी संघटना म्हणून आज सर्वत्र प्राथमिक शिक्षक समितीचे नाव सर्वश्रुत आहे,हातकणंगले तालुका शिक्षक समितीने शिक्षकांचा गुणगौरव करून वेगळी पाऊलवाट निर्माण केली आहे,भविष्यात याचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही, या कामाचे श्रेय संघटनेच्या कार्यक्षम कार्यकारणी व सभासदांना जाते असे गौरवोउद्गार हातकणंगले चे आमदार दलितमित्र अशोकराव माने यांनी व्यक्त केले, ते संजय घोडवत विद्यापीठ अतिग्रे येथे हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व महिला कार्यकारिणी मेळाव्यात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा हातकणंगले यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील ३० प्राथमिक शिक्षकांचा कै.भा.वा. शिंपी गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रेचे संचालक माननीय विराट गिरी , हातकणंगले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले,शिक्षक समितीचे राज्य नेते ज्योतीराम पाटील ,पुणे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक अर्जुन पाटील ,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर,राज्य महिलाध्यक्ष वर्षा केनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना समितीचे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी संघटना राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.ते म्हणाले, शिक्षकांच्या प्रश्नासाठी समितीने नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन रस्त्यावरील लढाई केली आहे.समितीने शाळेत गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांना नेहमीच बळ दिले आहे.
जिल्हा नेते जोतिराम पाटील,जिल्हाध्यक्ष प्रमोद तौउंदकर यांनी शिक्षक समितीच्या कार्याबद्दल गौरवोउद्गार काढले. शिक्षकांच्या पाठीवर थाप देऊन काम करणारी ही संघटना एक आगळीवेगळी संघटना आहे,.असे ते म्हणाले.
कार्यक्रमात हातकणंगले तालुक्यातील ३० आदर्श शिक्षकांचा सत्कार मानपत्र देऊन आमदार अशोकराव माने, उपस्थित सर्व राज्य, जिल्हा ,तालुका शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने सर्व शिक्षकांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यात आला.
मान्यवरांचे स्वागत शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुंभार व जिल्हा संपर्कप्रमुख मारुती पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पुणे विभागीय अध्यक्ष,शिक्षक बँकेचे विद्यमान संचालक अर्जुन पाटील यांनी हातकणंगले तालुका शिक्षक समितीच्या कार्याचा उंचावत जाणारा आलेख सर्वांसमोर मांडला.त्याचबरोबर समितीची बालक, पालक व शिक्षक यांच्या बाबतीत संघटनेची असलेली भूमिका आपल्या ओघवत्या भाषणामध्ये स्पष्ट केली.
दरम्यान हातकणंगले तालुका शिक्षक समिती महिला मेळाव्यामध्ये शिक्षक समिती महिला आघाडीची घोषणा तालुका अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांनी सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या संमतीने कार्यकारिणीची घोषणा केली.
या नुतन निवडी मध्ये वसुंधरा डांगरे ,(जिल्हा उपाध्यक्ष) , वंदना शिंदे (महिला तालुकाध्यक्ष) , स्वाती देसाई (महिला तालुका सरचिटणीस), माधुरी घस्ते (महिला तालुका कार्याध्यक्ष), माया सोनटक्के (महिला तालुका कोषाध्यक्ष), अनिता कुंभार (तालुका उपाध्यक्ष ), योजना देशमुख (तालुका उपाध्यक्ष), सुवर्णा अवघडी( तालुका संपर्कप्रमुख),तसेच मनीषा कोळी, सरला प्रधान, चंद्रभागा देशमुख यांची तालुका विभाग अंतर्गत उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी जिल्हा नेते कृष्णात कारंडे ,राज्य आघाडी प्रमुख सुधाकर सावंत ,शिक्षक बँक संचालक राजेंद्र पाटील, रामदास झेंडे, शिवाजी बोलके, बाबुराव परीट , रिजवान चमन शेख ,शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन सुरेश कोळी, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक बाजीराव पाटील, पुणे विभागीय प्रसिद्धीप्रमुख हरिदास वर्णे, महिला जिल्हा अध्यक्ष संगीता अस्वले ,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर,जिल्हा कार्याध्यक्ष गणपती मांडवकर,जिल्हा कोषाध्यक्ष सुनील कुंभार, संजय कुंभार , धनाजी शेवाळे, मारुती पाटील, प्रकाश पाटील, आनंदा गवळी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे शिक्षक समितीचे विविध तालुक्यातील अध्यक्ष, सरचिटणीस व हातकणंगले तालुक्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत खांडेकर, देवदत्त कुंभार, सागर पाटील तर आभार तालुका सरचिटणीस संजय मोरे यांनी मानले.
कार्यक्रमास हातकणंगलेचे पदाधिकारी महादेव गायकवाड, राजीव कोरे, सागर पाटील, विनायक तावरे, भिमराव पाटील, शब्बीर मोमीन, अनिल गायकवाड, बालाजी पांढरे, माणिक कागवाडे , सुदर्शन पाटील , अनिल वीर , नंदकुमार पिराई , भूपाल मंडगे, प्रकाश धातुंडे , सहदेव हरगे , वजीर मानकापुरे , देवदत्त कुंभार , राजेश पाटील , सुहास पाटील , जयेंद्र लाटणे, धनाजी पोफले, नरेंद्र कनोजे, प्रकाश सुतार, संदीप कोळी,सुनील निंबाळकर, श्रीकांत गुंडवडे, सुनील सोनवणे, राजाराम जाधव, संजय कांबळे, सचिन शिंदे, सतीश जयकर, सागर कुंभार, प्रकाश खरात, गोपाल लोंढे, दत्ता सोलंकर, श्रीकांत गुंडवडे, संजय बामणे, वैभव डावरे, गणेश आंधळे, दत्तात्रय शिंदे, सुशांत काटे, संतोष कोळी, शिवाजी लोखंडे, बाबासो अवघडी, अनिल नलवडे , आनंदा घाटगे, गोपाळकृष्ण गुंमठाणवर, राहुल शेंडगे, शिवाजी पाटील, प्रवीण पिसे, संदीप आळंदे, शरद कुंभार, अरुण कुंभार,संजय बनकर, सलीम मुल्ला, अशोक जाधव, नितीन कमते , सतीश रणशिंगे, लक्ष्मण जाधव, कुमार हेगडे, उमेश हारोलीकर , तुकाराम माने, सुशांत काटे , पारिसा पाटील आदी शिक्षक समितीचे शेकडो शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
चौकट-
या गुणीजनांचा झाला सन्मान!
अब्दुलकादिर पटेल,अर्चना भरते, अशोक जाधव,जनार्दन कुंभार, जयश्री पगारे, ज्योती बनकर ,दत्तात्रय गुडसे, दर्शनी शिनगारे, नीता जाधव,निगार कराडे, परविन काझी, बबीता टाकमारे, भानुदास वसगडे, मारुती झिपटे,राजाराम पाटील, राजमती पाटील,राहुल पाटील, रेखा चौगुले, रूपाली घाटगे, वैशाली कुंभार, शिरीष हावळ, शीला नाईक, सतीश रणशिंगे, सागर खोत, सुवर्णा अवघडी, सुनीता माळी, सुनंदा नलवडे, संजीवनी कुंभार,संतोष कोळी, स्वाती गुमठाणवार यांना शिक्षक नेते कै. भा.वा. शिंपी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले
(फोटो ओळी- हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शाळात गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ३० उपक्रमशील शिक्षकांना कै. भा.वा. शिंपी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना आमदार अशोकराव माने, सोबत समितीचे जोतिराम पाटील, कृष्णात कारंडे ,प्रमोद तोंदकर, अर्जुन पाटील, संजय कुंभार, मारुती पाटील, सचिन कोल्हापुरे,संजय मोरे आदी.)










