खाजगी प्राथ. शिक्षक सह. पतसंस्थेस ३ कोटी ५ लाखावर नफा-चेअरमन मच्छिंद्र नाळे
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस तीन कोटी पाच लाखावर नफा-चेअरमन मच्छिंद्र नाळे
खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
कोल्हापूर/प्रतिनिधी
खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेस चालू अहवाल सालात तीन कोटी पाच लाखावर नफा झालेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यानी सांगितले ते पतसंस्थेच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पदावरून बोलत होते.श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा येथे ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली संस्थेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात सर्व संचालकांच्या उपस्थितीत संस्थापक व तज्ञ संचालक भरत रसाळे यांच्या हस्ते वृक्ष जलार्पण व दीप प्रजलन करून झाली.
या सभेत बोलताना चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी “पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सालात पतसंस्थेने शंभर कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून सहाशे कोटीचा व्यवहार केलेला आहे यातून पतसंस्थेला तीन कोटी पाच लाख इतका विक्रमी नफा झालेला असून या नफ्यातून सभासदांना 15 टक्के लाभांश व 29 टक्के भेटवस्तू असा एकूण 44% पर्यंतचा लाभ देण्यात येणार असलेचे त्यांनी जाहीर केले तसेच सभासदांच्या कर्जाचा व्याज दर कमी केला असून त्यांना 9 टक्के व्याजाने 50 लाख पर्यंतचे कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली*
या सर्वसाधण सभेमध्ये कुमार पाटील,टी आर पाटील , सागर पाटील,गोरख वातकर , संतोष पाटील , संतोष आयरे ,आनंदा हराळे ,सचिन शेवडे यांनी सहभाग घेतला.संस्थापक भरत रसाळे व संचालक राजेंद्र कोरे यांनी सभासद कुटुंब कल्याण ठेव मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
स्वागत संचालिका रोहिणी येडगे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन कृष्णात चौगुले यांनी मानले.प्रोसिडींग वाचन कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी केले.सभेचे सूत्रसंचालन संचालक शिवाजी सोनाळकर यांनी केले.यावेळी संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांचा वाढदिवसही उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वसाधारण सभेस संचालक सर्वस्वी सूर्यकांत बरगे,सर्जेराव नाईक, सौ माधुरी घाटगे, साताप्पा कासार, वसंत पाटील, राजेश कोंडेकर ,महादेव डावरे अमित परीट, माजी चेअरमन शिवाजी भोसले यांच्यासह सल्लागार समिती सदस्य श्री संभाजी सुतार ,आप्पासाहेब वागरे,पंडित मस्कर ,चंद्रकांत वाकरेकर ,दशरथ कांबळे यांच्यासह अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते.
सभेत केलेल्या अन्य घोषणा
१.वर्षात नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना व्याजदरांत पावटक्का रिबिट : २.शून्य टक्के व्याज दराने इ -बाईक ,३. परदेशी शिक्षणासाठी निवड झालेल्या मुलांना रुपये दहा हजारची भेट ४.30 शाळांना प्रत्येकी 10 हजार रुपये प्रोत्साहन भेट ५.मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना तात्काळ दहा हजार रुपयांची रोख भेट अशा घोषणा केल्या.










