समाजासाठी राबणाऱ्यांच्या पाठीवर कै.माणिकराव पाटील फाउंडेशनची शाबासकीची थाप!
समाजासाठी राबणाऱ्यांच्या पाठीवर कै.माणिकराव पाटील फाउंडेशनची शाबासकीची थाप!
समाजातील अनेक गुणीजनांचा गौरव
माणिकराव पाटील फाउंडेशन च्या पुरस्काराचे वितरण
कोल्हापूर/मारुती फाळके
कोल्हापुर येथील कै.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन च्या वतीने नुकताच शाहू स्मारक भवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४५ गुणवंतांना “आदर्श पुरस्कार”देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख रणधीर शिंदे म्हणाले, आज समाजामध्ये समाजासाठी राबणाऱ्या हातांची संख्या निवडक असली तरी या राबणाऱ्या लोकांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये एक संस्काराची पाऊलवाट तयार होत आहे यातूनच एक दिवस सद्विचारांचा राजमार्ग तयार होईल. माणिकराव पाटील फाउंडेशन चे कार्य सातत्याने समाजातील राबणाऱ्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे आहे.असे सत्कार्य फाउंडेशन च्या माध्यमातून घडत राहो. समाजामध्ये चांगल्याच कौतुक होणं ही दुर्मिळ गोष्ट होत असताना कै. माणिकराव पाटील फाउंडेशन चे कार्य समाजाला अनुकरणीय आहे., असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एच एस सी बोर्डाचे माजी सहसचिव डी.एस पवार ,उपशिक्षणाधिकारी आर. जी. चौगुले,गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार तसेच मोहन भोसले, आर. जी. पाटील, जि प कर्मचारी सोसायटीचे संचालक सुनील पाटील, शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे-पाटील,संचालक गौतम वर्धन,अमर वरुटे, गजानन कांबळे,सुकुमार पाटील, मंगेश धनवडे,सदानंद शिंदे, संचालिका पद्मजा मेढे, संजय कुर्डूकर, स्वाती पाटील, आनंद यादव, चंद्रकांत कद्रे, मारुती वाडकर,तानाजी मेढे , गणेश ढेंगे, पांडुरंग पाटीलआदी मान्यवर,पुरस्कारप्राप्त गुणिजन व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक तुषार पाटील, अध्यक्षा सुनिता पाटील, सचिव धनश्री पाटील उपाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
(फोटो ओळी-कै. श्री. माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,च्या वतीने गुणवंत पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारप्राप्त गुणिजन.)










