१५ टक्के लाभांश,कर्जाचा व्याजदर ९.५ टक्के- चेअरमन शोभा पाटील
१५ टक्के लाभांश,कर्जाचा व्याजदर ९.५ टक्के
-चेअरमन शोभा पाटील
यशवंत शिक्षक पतसंस्थेचा क्रांतिकारी निर्णय.
४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
भेडसगाव/मारुती फाळके
शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सर्वांत जुनी आर्थिक शिखर संस्था असलेल्या शाहूवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्थेला अहवालसालात १०,६३,५७८ इतका विक्रमी नफा झाला असून,सभासदांना ५ टक्के लाभांश,कर्जाचा व्याजदर ९.५ टक्के करण्याचा क्रांतिकारी निर्णय संचालक मंडळ घेत असल्याचे संस्थेच्या चेअरमन शोभा पाटील यांनी सांगितले.त्या शाहूवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्थेच्या ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या.
प्रारंभी स्वागत माजी अध्यक्ष संजय आपटे यांनी केले.
यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील म्हणाल्या, रु.३० लाखांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर ९.५ टक्के इतका करण्यात आला असल्याचे जाहीर केले.यावेळी त्यांनी सभासदांना इतक्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करणारी यशवंत शिक्षक पतसंस्था ही शाहूवाडी तालुक्यातील पहिली व एकमेव प्राथमिक शिक्षक पतसंस्था झाली असल्याचे सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील यांनी अहवाल वाचन केले.
विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.तसेच सभासदांची वर्गणी कायम ठेव रक्कम पुनर्रगुंतवणुक कायम ठेव योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.संस्थेला यावर्षी १०,६३,५७८/- रुपये इतका नफा झाला असून सभासदांना विक्रमी १५ टक्के लाभांश रोख वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत अरुण पाटील,संजय जगताप,अर्जुन जानकर,सदाशिव कांबळे,संभाजी साठे,आनंदराव हारुगडे यांनी सहभाग घेतला.
दि प्राथमिक शिक्षक बँक लि कोल्हापूरचे चेअरमन शिवाजी रोडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेने सभासदांना ९.५ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा व १५ टक्के लाभांश वाटप करण्याच्या संस्थेच्या या सभासदहिताच्या व आदर्श निर्णयाचे कौतुक केले आणि संचालक मंडळ,सल्लागार मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा, गुणवंत विद्यार्थी,राज्य,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,शालार्थ प्रतिनिधी,मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हेमंत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला.
सभेला संचालक चंद्रकांत पाटील,शिवाजी पाटील(शिंपे),विक्रम पोतदार,संपतराव पाटील,रघुनाथ शेळके,अनिल म्हाऊटकर,सुनील पाटील,यशवंत पारळे,सुनील सुतार,तौसिफ पटेल,राजाराम पाटील,सर्व सल्लागार मंडळ,सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार गावडे यांनी केले व आभार संस्थेच्या व्हाईस चेअरमन सुरेखा यादव यांनी मानले.
(फोटो ओळी-सभेत बोलताना चेअरमन शोभा पाटील,व्यासपीठावर शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील,व्हा.चेअरमन सुरेखा यादव,संचालक हेमंत भालेकर, चंद्रकांत पाटील,शिवाजी पाटील(शिंपे),विक्रम पोतदार,सदाभाऊ कांबळे, तौसिफ पटेल, संपतराव पाटील,रघुनाथ शेळके,अनिल म्हाऊटकर,सुनील पाटील,यशवंत पारळे,सुनील सुतार आदी.)










