March 18, 2026

शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेला १७ लाख २९ हजाराचा नफा,११ टक्के लाभांश जाहीर.

0
IMG-20250924-WA0021

शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेला १७ लाख २९ हजाराचा नफा, ११ टक्के लाभांश जाहीर.

अल्पावधीत संस्थेचा नावलौकिक

भेडसगाव/मारुती फाळके

सभासदाभिमुख कारभारामुळे अल्पावधीतच नावारूपास आलेल्या शिक्षक नेते शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेला
अहवाल सालात १७,२९,५७६/- रुपये इतका नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश
जाहीर करत असल्याचा निर्णय चेअरमन,संचालक मंडळाने घेतला.
संस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पळसे हॉल शाहूवाडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सुरुवातीला स्वागत संस्थेच्या शाहूवाडी शाखेचे अध्यक्ष दिलीप भोसले यांनी केले.
संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी सुर्वे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.

संस्थेला अहवालसालात १७,२९,५७६/- रुपये इतका नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश रोख वाटप केले व दीपावली भेटवस्तू वाटपासाठी केलेली तरतूद रूपाने १२ टक्के असा एकत्रित २३ टक्के डिव्हिडंड वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी सुर्वे यांनी जाहीर केले.

यावेळी झालेल्या चर्चेत ज्ञानदेव मोरे,उत्तम खुटाळे,आनंदराव हारुगडे,मधुकर पाटील,नाना कांबळे,किरण शिंदे,संभाजी साठे,अमर पाटील,रमेश कांबळे यांनी सहभाग घेतला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या बांबवडे शाखा अध्यक्ष प्रकाश पाटील(सोनवडेकर) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे-पाटील यांनी संस्थेच्या भावी योजनांबाबत माहिती दिली तर संस्थेचे संस्थापक हेमंत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला.संस्थेने रु.२८ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.तसेच संस्थेने स्वमालकीच्या इमारतीसाठी अडीच गुंठे प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा, गुणवंत विद्यार्थी,राज्य,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,शालार्थ प्रतिनिधी,मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सभेला संचालक भानुदास माने,विजय गुरव,संजय पाटील,सुनील नलगे,दिनकर कांबळे,गणपती पाटील,उमरफारुक आत्तार,अंकुश पाटील,सुभाष सुतार,मारुतीसिंह ऱ्हाटवड,चंद्रशेखर जंगम,समीर गुरव,कमल दिंडे,जयश्री मगदूम,कलावती येळवणकर तसेच सर्व शाखांचे संचालक मंडळ,सल्लागार मंडळ,सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विजयकुमार गावडे, आभार व्हा. चेअरमन जयश्री कुंभार यांनी मानले.

चौकट

शिवाजी रोडे-पाटील  गृह तारण संस्थेची  अल्पावधीत आर्थिक वृद्धी- हेमंत भालेकर

सन २०१४ साली  स्थापन झालेल्या शिक्षक नेते शिवाजी रोडे -पाटील गृहतारण पतसंस्थेने अल्पावधीतच सभासदाभिमुख व पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. अवघ्या ८ वर्षाच्या कालावधीत संस्थेने गरुडभरारी घेतली असून ३० कोटीचा मिश्र व्यवसाय संस्थेने पूर्ण केला आहे. सभासदांचे हित व जास्तीत जास्त आर्थिक लाभ होण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. कार्यकुशल कर्मचारी वर्ग, सुकाण समिती व संचालक मंडळाचे संस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी लक्ष असल्यामुळे संस्थेने अल्पावधीत गरुड भरारी घेतली आहे.संस्थेतील आकर्षक ठेव योजनेत लोकांनी सहभागी व्हावे.

हेमंत भालेकर- संस्थापक अध्यक्ष

शिवाजी रोडे- पाटील गृह तारण पतसंस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!