समाजशिक्षिका करुणा मोहिते यांना शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
समाजशिक्षिका करुणा मोहिते यांना शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
कोल्हापूर/मारुती फाळके
निगडी ता शिराळा जि सांगली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक महेश पालकर, राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा निगडी तालुका शिराळा जिल्हा सांगली यांनी आपल्या शाळेचा लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून कायापालट केला. विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवार्ड ,हेकेथॉन विज्ञान प्रदर्शन,, स्काऊट गाईड यातून विद्यार्थ्यांना राज्य राष्ट्रीय स्तरावर पोचवले, . विद्यार्थ्यांना विविध भौतिक सुविधा मिळविल्या. संगणक कक्ष, ग्रंथालय,विज्ञान,प्रयोगशाळा,पिण्याच्या पाण्याची टाकी, संगणक, स्कूल बॅग, स्पोर्ट ड्रेस, वह्या असे विविध शैक्षणिक साहित्य मिळविले. लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध ऑनलाईन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग घेऊन यश मिळविले.
कोरोनाकाळात संपूर्ण जग थांबले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना उत्कृष्टपणे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. कोरोनाकाळापासून निरंतर वाचन उपक्रम त्या राबवीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे. याबाबत त्यांनी राज्यस्तरावर शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक आणि राज्यातील
निवडक उपक्रमशील शिक्षक यांच्यासमोर निरंतर वाचन प्रभावीपणे सादरीकरण केले. त्याबद्दल शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांनी त्यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व उपक्रमात प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे आणि वर्चुअल क्लास, दीक्षा ॲप अभ्यासक्रम निर्मिती, R1 व R2 कृती पुस्तिका निर्मिती, शालेय दिनदर्शिका निर्मिती, पॅट चाचणी निर्मिती या राज्यस्तरीय उपक्रमात त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कृतिशील मार्गदर्शन केले. शासनाच्या अनेक विषयांच्या अभ्यासक्रम निर्मितीत त्यांनी काम केले. शासनाच्या पोर्टलवर त्यांचे अनेक ई- साहित्य अपलोड करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होत आहे. त्यांनी राबविलेले नवनवीन उपक्रम राज्यस्तरावर पात्र ठरले. त्याबद्दल त्यांना शासनाच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. मॅडमनी सामाजिक बांधिलकी जपत समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधवा प्रथा बंदीसाठी ठस पाऊल उचलले. विधवा महिलांना समाजामध्ये धार्मिक सामाजिक विधीमध्ये सहभाग घेता यावा यासाठी गावोगावी सभा घेऊन मार्गदर्शन व जनजागृती करून महिला सक्षमीकरणाचे काम केले. म्हणूनच त्यांना थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यातील महिलांमधून त्या एकमेव या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत.
त्यांच्या या पुरस्कारासाठी शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, शिराळा तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील,संजय पाटील , बाजीराव देशमुख, केंद्रप्रमुख सुहास रोकडे, मुख्याध्यापक,शिक्षक,पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य गावचे सरपंच उपसरपंच सदस्य, विद्यार्थी पालक यांचे कडून अभिनंदन होत आहे.
(फोटो ओळी-उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते यांना सावित्रीबाई राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पुरस्कार स्वीकारताना करुणा मोहिते, सोबत पती सुनील कांबळे, आई कमल मोहिते,वडील बाबुराव मोहिते, चि. संकल्प कांबळे, संस्कार कांबळे.)










