May 14, 2026

‘टीईटी’ च्या विरोधात शैक्षणिक व्यासपीठाचा ४ ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुक मोर्चा

0
IMG-20250929-WA0000

‘टीईटी’ च्या विरोधात शैक्षणिक व्यासपीठाचा ४ ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुक मोर्चा

कोल्हापूर /प्रतिनिधी

र्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटी बाबत महाराष्ट्र शासनाने त्वरीत पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी व सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती करू नये या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे शनिवार दि ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्याचा निर्णय विद्याभवन येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत घेण्यात आला. ही सभा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

मूक मोर्चाचे नियोजन करण्यासाठी या सभेत
आमदार जयंत आसगावकर, एस. डी. लाड,दादा लाड, प्रभाकर आरडे, बी. जी. बोराडे,भरत रसाळे,प्रमोद तौंदकर, राजाराम वरुटे, राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, विलास पिंगळे, संतोष आयरे,प्रसाद पाटील, उमेश देसाई, संभाजी बापट आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

या प्रसंगी राज्य शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक डॉ. डी. एस. घुगरे व शिक्षक नेते भरत रसाळे यांना महात्मा गांधी जीवन गौरव पुरस्कार मिळालेबद्दल व्यासपीठातर्फे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी चेअरमन राहूल पवार, सचिव आर. वाय. पाटील, प्रा. सी एम गायकवाड, सुधाकर निर्मळे, प्रभाकर हेरवाडे, राजेश वरक, बाबासाहेब रणसिंग,धनाजी पाटील ,सतिश लोहार, संदीप पाथरे, राजाराम संकपाळ, सुरेश सोमेश्वर, एस के पाटील, बाजीराव कांबळे ,प्रसाद पोतदार ,नंदकुमार इनामदार, शिवाजी भोसले, शिवाजी सोनाळकर, मनोहर जाधव, संजय गांगण, प्रताप देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

(फोटो ओळी -शैक्षणिक व्यासपीठ सभेत मार्गदर्शन करतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी एस. डी. लाड,दादा लाड, राहूल पवार, प्रभाकर आरडे, बी. जी. बोराडे,भरत रसाळे आदी मान्यवर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!