महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ(थोरात गट) उद्या रविवारी महामंडळ सभा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाची उद्या रविवारी महामंडळ सभा
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा जय पॅलेस हॉल, कोल्हापूर गारगोटी रोड कळंबा येथे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या सभेस राज्याचे शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे व राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशीमाहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील व सरचिटणीस सुनील पाटील यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे सक्तीचे केल्याबद्दल तसेच शिक्षण सेवक पद कायमस्वरूपी रद्द करावे. २००५ नंतर
सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, एम एस सी आय टी वसुलीचा शासन निर्णय रद्द करावा, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संच मान्यता निकष रद्द करून पूर्वीप्रमाणेच संच मान्यता करण्यात यावी, महानगरपालिका, नगरपालिका शिक्षकांना वेतनासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे यासह इतर विषयावर महामंडळ सभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन टीईटीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
यावेळी रविकुमार पाटील, सुनील पाटील, एस व्ही पाटील, रघु आप्पा खोत, एन वाय पाटील, मामा भोसले, आनंदराव जाधव, मधुकर येसने श्री रावसाहेब देसाई, शिवाजी रोडे पाटील,किरण शिंदे आदींसह प्राथमिक शिक्षक बँकेचे सर्व संचालक, तसेच जिल्हा सदस्य उपस्थित होते.










