टी ई टी’बाबत सरकारच्या वतीने पुनर्विचार याचिका, कॅशलेस आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन- हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर
‘टी ई टी’बाबत सरकारच्या वतीने पुनर्विचार याचिका, कॅशलेस आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन- हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर
सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकद दाखवू- संभाजीराव थोरात
कोल्हापूर/मारुती फाळके
राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ज्याप्रमाणे कॅशलेस आरोग्य सुविधा लागू आहे, त्याचप्रमाणे शिक्षकांनाही नजीकच्या काळात कॅशलेस आरोग्य विमा लागू करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा कोल्हापूर चे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, तसेच येत्या बुधवारी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी चर्चा करून ‘टीईटीच्या बाबत’शिक्षणमंत्री यांचे मार्फत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात होते.कोल्हापुरातील कळंबा येथील जय पॅलेस येथे महामंडळ सभा झाली.
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले,ज्याप्रमाणे इतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा लागू आहे त्याचप्रमाणे शिक्षकांना सुद्धा कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करणार असून टीईटीच्या अन्यायकारक निर्णयाबद्दल शासन शिक्षकांच्या बाजूने सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्राथमिक शिक्षकांना टीडी परीक्षेची सक्ती केली आहे;हा अन्यायकारक निर्णय आहे.यामुळे शिक्षकांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे. याबाबत मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात म्हणाले, सेवेत येताना त्या- त्या वेळी शासनाने निर्धारित केलेल्या परीक्षा गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन शिक्षक सेवेत आलेले आहेत. शिक्षक कधीच परीक्षेला घाबरत नाहीत, मग विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षक केडरचीच परीक्षा कशासाठी?
महाराष्ट्रातील २८८ आमदारांची आणि अधिकाऱ्यांची अगोदर परीक्षा घ्या. आणि मगच शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती करा असा घणाघात शिक्षक संघाचे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी केला.
ते म्हणाले,’टीईटी’ विरोधात कायदेपंडितांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या मार्फत पुनर्विचार याचिका दाखल करूच पण राज्य शासनाच्या विरोधात ही आरपारची लढाई करू असेही थोरात म्हणाले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत बोलताना थोरात म्हणाले, ऑनलाइन च्या कामाची सक्ती,अन्यायकारक संचमान्यता धोरण याविरोधात सुद्धा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इथून पुढच्या काळात शासनाच्या अन्यायकारक निर्णयाबाबत कायदेशीर लढाई लढू. टीईटीच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करून उपयोग नाही तर त्यासाठी कायदे पंडितांच्या मदतीने कायदेशीर मार्गांचा अवलंब करून कायदेशीर मार्गाने हा लढा उभारला जाईल. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल, असा विश्वास संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केला. शिक्षक संघ नेहमीच शिक्षकांच्या वरील अन्यायकारक निर्णयासाठी बांधील राहिला आहे.शिक्षकांवर अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक संघ कुठेच कमी पडणार नाही, यासाठी येणाऱ्या काळात शिक्षकांनी सहकार्य करावे ;असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारने टीईटीच्या विरोधात पाऊल उचलले नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थां जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकीत होत्याचं नव्हतं करू असा थेट इशाराही संभाजीराव थोरात यांनी सरकारला दिला.
यावेळी महामंडळ सभेत खालील ठराव करण्यात आले. १.टीईटीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांची बाजू भक्कमपणे मांडावी.
२. सर्व प्रकारची ऑनलाइन कामे, अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत
३ अन्यायकारक शिक्षक संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा
४.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विनाअट लागू करावी.
यावेळी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, ज्या शिक्षकांनी 20- 25 -30 वर्षे नोकरी केली त्यांनी सेवेत येतानाच त्या त्या पदाची अर्हता,गुणवत्ता आणि पात्रता परीक्षा देऊन सेवेत पदार्पण केले आहे. गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय शिक्षकांना नोकरी लागलेलीच नाही मग राज्यातील आठ लाख शिक्षकांना ही परीक्षा कशासाठी?राज्यातील आठ लाख शिक्षकांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे,वतीने लवकरच ही पुनर्विचार याचिका दाखल करू. यापूर्वी शिक्षक संघाने अन्यायकारक संचमान्यतेच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल केली आहे.
शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले म्हणाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही श्रमिक संघाच्या मान्यतेने नोंदणीकृत असलेली अधिकृत संघटना आहे.राज्य शिक्षक संघ ही राज्यातील शिक्षकांची सर्वात मोठी संघटना असून प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न या संघटनेने सोडवलेले आहेत. शिक्षकांच्या अस्तित्वाला हादरा देणारा टीईटीचा प्रश्न, कॅशलेस योजना यासाठी ही तातडीने ही महामंडळ सभा बोलावल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत राज्य कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले,राज्य संपर्क प्रमुख एस व्ही पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक सुनील पाटील यांनी तर राज्य प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी तसेच विनायक शिंदे, बाळासाहेब तांबारे,बाबासाहेब जगताप, मधुकर काठोळे यांनी मनोगते व्यक्त केली.सभेचे सूत्रसंचालन किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले.
महामंडळ सभेस बाळासाहेब झावरे, बळवंत पाटील, कैलास दहातोंडे यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य,शिक्षक कार्यकर्ते, महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर यांनी आभार मानले.
सभेस मोहन भोसले, एन वाय पाटील, जनार्दन नेउंगरे, रघुनाथ खोत, सुनील एडके, बाळकृष्ण हळदकर, नंदकुमार वाईगंडे, पद्मजा मेढे, मधुकर येसणे, जयवंत पाटील,आनंदराव जाधव, दिनकर पाटील, जीवन मिठारी, संभाजी पाटील, प्रकाश खोत, रावसाहेब देसाई,दयानंद पाटील, खामकर, अरुण चाळके, अजित पाटील,धनाजी रावण, मनोहर सरगर, प्रकाश येडगे, विजय भोसले, शशिकांत पाटील, सुनील कदम,हेमंत भालेकर, जयवंत पाटील,सदानंद शिंदे, अनिल बागडी, तानाजी सनगर, भीमराव रेपे,सखाराम अंगठेकर,सदाभाऊ कांबळे, विक्रम पोतदार,संजय जगताप,अनिल अंगठेकर, अशोक पाटील, रावसाहेब पाटील, जयश्री कांबळे, संजय मोरे, रोहिणी लोकरे, सदानंद पाटील,महेश शिंदे, बालाजी कोपरकर, संतोष भोसले, किरण पाटील, इंद्रजीत कदम, मुनीर चौगुले, सुनील चौगुले, आयाज बागवान, प्रकाश फराकटे, साताप्पा पाटील, अशोक पाटील, प्रकाश सोनी,संदीप सुतार, अमोल खोबरे, आनंदा शेळके, मनोहर नाईक,संजीव नाईक, प्रकाश मगदूम, सोनाली परीट, प्रेमाताई कदम, पुष्पावती दरेकर, अरुणा कोठावळे, श्रीकांत वरुटे,राजेश वाघमारे, संजय कदम, राजेश जाधव, शरद पाटील, सुखदेव पाटील, जयसिंग पाटील,सुरेश भानुसे, शाहू पाटील, आदीसह राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळेतील शिक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
चौकट-१
कोल्हापूरच्या जिल्हा कार्यकारिणीने करून दाखविले!
अगदी कमी वेळात राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतल्याप्रमाणे महामंडळ सभा कोल्हापूरला घेण्याचे निश्चित झाले. नियोजनासाठी अगदी कमी कालावधी असताना प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर शाखेने अगदी नेटके नियोजन करून महाराष्ट्रातून आलेल्या शिक्षकांची व्यवस्था आणि योग्य पाहुणचार केला. यामध्ये विलास चौगुले,रवीकुमार पाटील,सुनील पाटील,बाळासाहेब निंबाळकर,तानाजी मेढे,किरण शिंदे,विशाल प्रभावळे यांसह सर्व जिल्हा-तालुका कार्यकारिणीचे योगदान असून कोल्हापुरी पाहुणचार केल्याबद्दल संभाजीराव थोरात यांनी कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यकारणी व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
चौकट-२
बुधवारी शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा!
शिक्षकांच्या वरील अन्यायकारक “टीईटी”च्या निर्णयाविरोधात बुधवारी शिक्षण मंत्री दादासो भुसे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आबिटर यांनी सांगितले.त्यामुळे आता समस्त शिक्षकांचे शिक्षणमंत्री दादासो भुसे यांच्यातील चर्चेकडे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट-३
नवीन प्रवेश, नवीन नियुक्त्या..
या महामंडळ सभेत राधानगरी तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष संतोष भोसले, लातूर शिक्षक काँग्रेसचे केशव गंभीरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे तुषार पाटील,एन एम पाटील, प्रथम वर्तक, विकास लाटकर(शिरोळ)यांनी शिक्षक संघात प्रवेश केला.
यावेळी झालेल्या नवीन नियुक्त्या-
सांगलीचे अविनाश गुरव यांना शिक्षक संघ कोषाध्यक्ष,
समाधान ऐवळे-प्रसिद्धिप्रमुख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष- आप्पाराव शिंदे
लातूर जिल्हाध्यक्ष- विजयकुमार उत्ते, आणि जुनी पेन्शन संघटना शिक्षक संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी तुषार पाटील(कोल्हापूर) यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
चौकट-४
राज्यभरातून 3000 च्या वर शिक्षकांची उपस्थिती!
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेसाठी राज्यभरातून 3000 च्या वर शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक ,महिला शिक्षिका यांची उपस्थिती होती.
चौकट-५
टीईटी परीक्षेचा फॉर्म भरू नये-शिवाजी रोडे पाटील
‘टी ई टी’परीक्षेसाठी शासनाने ९ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली असून यासाठी कोणीही शिक्षकांनी परीक्षेसाठी अर्ज करू नये. संघटना या प्रश्नासाठी बांधील राहून शिक्षकांना निश्चितपणाने न्याय मिळवून देणार असल्याचे शिक्षक संघाचे नेते,कोल्हापूर जिल्हा दि. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे-पाटील शिक्षक कार्यकर्त्यांना सांगितले.










