December 10, 2025

टी ई टी’ च्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार हलणार नाही -सतेज पाटील खाजगी शिक्षक सेवक समितीच्या शिक्षण जागर पुरस्काराचे वितरण

0
IMG-20251107-WA0007(1)

टी ई टी’ च्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार हलणार नाही -सतेज पाटील

खाजगी शिक्षक सेवक समितीच्या शिक्षण जागर पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर/मारुती फाळके

स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर अनेक प्रयोग झाले. शैक्षणिक बदल करीत असताना ते गुणवत्तेला प्राधान्य देणारे असावेत. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवस्थेला वेठीस धरणारे नसावेत.सर्वसामान्यांचे शिक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. टीईटी सक्तीची करून सरकारने शिक्षकांवर अन्याय केला आहे. लाडक्या बहीणींच्या मतांच्या जोरावर सरकार काहीच करायला तयार नाही. त्यामुळे ८ नोव्हेंबर होणाऱ्या मोर्चात सर्व शिक्षक संघटना,शिक्षक -कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघटीत ताकद दाखवल्याशिवाय सरकार हलणार नाही, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

संघटनेचे राजाध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने आयोजित शिक्षण परिषद व शिक्षण जागर पुरस्कार वितरण सोहळ्यात आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे होते. याप्रसंगी सात ठराव एकमताने मंजूर केले. तर २९ शिक्षक-शिक्षिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आमदार पाटील म्हणाले, शिक्षकांनी कालानुरूप स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. जुनी पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरात पहिल्यांदा मोर्चा काढला. त्यानंतर राज्यभर मोर्चे निघाले आणि सरकारने चर्चेला विषय घेतला. गेल्या ७० वर्षात शैक्षणिक धोरणात अनेक बदल झाले. परंतू सध्याच्या सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करताना सरकारी शिक्षण व्यवस्था मोडीत काढला आहे.सरकारला बहुजनांचे शिक्षण टिकवायचे नाही.२०१३ अगोदरच्या शिक्षकांना टीईटी सक्तीची करून सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या निर्णयाविरोधात पाच राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने शिक्षकांची फसवणूक केली आहे. सरकार बहुमताच्या जोरावर काहीही केले तरी चालतय अशा अविर्भावामध्ये आहे. प्रत्येकाने ८ रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होत सरकारला ताकद दाखवली पाहिजे. तसेच तंत्रज्ञानात विद्यार्थी एक पाऊल पुढे आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी स्क्रिन टाईम कमी करून शिक्षकांनी एआयचे छोटे छोटे कोर्स पूर्ण केले पाहिजेत.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. विनाअनुदानित शिक्षकांना तीनवेळा अनुदानाचा वाढीव टप्पा दिला आहे.

अध्यक्षस्थानावरून रसाळे म्हणाले, टीईटी सक्तीच्या विरोधातील ८ व २४ नोव्हेंबरच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. प्रभाकर हेरवाडे, सुधाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

–शिक्षण परिषदेत मंजूर झालेले ठराव—-

टीईटी अनिवार्य करण्याच्या १.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी.
२.केंद्र सरकारने स्वतःहून लार्जर बेंचकडे पुनर्विचार करणे संविधान कलम १४ व २१ च्या Natural justice च्या नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याचे निदर्शनास आणून द्यावे.
३.केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये स्वतः संशोधन करून सेवेत कार्यरत शिक्षकांना टीईटी पूर्ण करण्याची सक्ती रद्द करावी.
४.शिक्षण हा विषय समवर्ती सुचिमध्ये येत असल्याने महाराष्ट्र शासनाने स्वतंत्रपणे निर्णय घेऊन सेवेत सर्व शिक्षकांना टीईटीसक्ती पासून संरक्षित केल्याचा निर्णय जाहीर करावा.
५.महाराष्ट्र शासनाच्या आश्रमशाळा व अन्य काही विभागाने टीईटी सक्ती संदर्भात काढलेले आदेश मागे घेण्याचे निर्देश त्या त्या विभागांना द्यावेत.
६. सर्व आमदारांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांना पत्रे पाठवावीत व सर्व खासदारांनी मा. पंतप्रधान यांना पत्र पाठवून RTE 2009 मधील टीईटी सक्तीचे कलम रद्द करण्याची मागणी करावी
७. सेवेत असलेल्या शिक्षकांनी अंतिम निर्णय लागेपर्यंत टीटी परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्याची घाई करू नये.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुमार पाटील,सूत्रसंचालन चारुलता पाटील,प्रकाश वांद्रे तर आभार शिवाजी भोसले यांनी मानले.
कार्यक्रमास प्रगती कोळेकर,वर्षाराणी वायदंडे बादशहा जमादार,शिवाजी भोसले, सविता गिरी, किरण खटावकर, प्रशांत गुरव, आप्पासाहेब वागरे,प्रल्हादसिंह शिलेदार यांच्यासह खाजगी शिक्षक सेवक समितीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————————-

या शिक्षकांचा झाला गौरव–

निवेदिता बाबर, स्मिता दीक्षित, सुनंदा खांडेकर, परशराम आवळे, संगीता शेडबाळे,अमोल गायकवाड, निशा सूर्यवंशी, दत्तात्रय पाटील, सारिका पाटील, गीता वारे,शितल सूर्यवंशी, छाया गवळी, सागर पाटील, प्रफुल्ल बच्चे, पद्मजा महाडेश्वर, रेखा भोसले,शारदा पाटील, मिलिंद गुरव, धैर्यशील पाटोळे, मानसी खडकेकर, प्रदीप कतगर, विभावरी संघवी, प्रकाश मुचंडी, प्रज्ञा पावसकर,सविता पाटील, सुनंदा बिरंजे,वंदना सुर्वे, गीता चिंदके,दत्तात्रय माने.

(फोटो ओळी-कोल्हापूर : शिक्षण परिषद व शिक्षण जागर पुरस्कार वितरण सोहळयात मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील. सोबत प्रभाकर हेरवाडे, भरत रसाळे, आमदार जयंत आसगावकर, सुधाकर सावंत, वसुंधरा कदम उमेश देसाई आदी. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!