कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी गौतम वर्धन यांची फेरनिवड
कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी गौतम वर्धन यांची फेरनिवड
कोल्हापूर/मारुती फाळके :
कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी गौतम वर्धन यांची फेरनिवड करण्यात आली. यानिमित्त संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे व कास्ट्राईब महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा कोल्हापूरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने गौतम वर्धन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय कुर्डूकर , तुकाराम संघवी , पी डी सरदेसाई , ए.एल कांबळे , बी वाय कांबळे , विजय कांबळे , डी. के . काबळे, जी के कांबळे , दिनकर जगदिश , कृष्णा सुतार, बाबासाहेब कांबळे , विलास कांबळे , संजय कदम , अशोक कांबळे , एन एस कांबळे , बी एस कांबळे , विकास कांबळे उपस्थित होते. दरम्यान गौतम वर्धन यांची तीन वर्षासाठी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या महिन्याभरात जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्षांच्या निवडी होतील.










