March 26, 2026

धोंडीराम वायदंडे सर यांना पितृशोक.

0
IMG-20230622-WA0001

धोंडीराम वायदंडे सर यांना पितृशोक.

कोल्हापूर/मारुती फाळके

           विद्यामंदिर कोगील खुर्द शाळेचे विषयशिक्षक श्री.धोंडीराम वायदंडे(सर) यांचे वडील,व नूतन मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षाराणी वायदंडे यांचे सासरे श्री. शंकर धोंडी वायदंडे वय (८४)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.,त्यांच्या पश्चात ३ मुले,२मुली सुना, नातवंडे,परतुंड असा मोठा परिवार आहे.उत्तरकार्य दि.२६ जून सोमवार येवती येथे आहे.

 

           शंकर वायदंडे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले कुटुंब घडवले.,मितभाषी सुसंस्कारी आणि विनयशील स्वभावामुळे ते लोकांच्या नेहमी चर्चेत असत.घरी नित्य नियमाने ग्रंथाचे वाचन,पारायण करण्यात ते नेहमी मग्न असायचे.त्यांना अध्यात्माची प्रचंड ओढ होती. सहवासात आलेल्या प्रत्येकालाआपल्या निगर्वी,नम्र आणि माणूसपणाच्या गुणांनी ते नेहमी जवळचे वाटायचे.

 

आयुष्यभर केलेल्या अपार कष्टाच्या बळावर त्यांनी आपली मुले घडवली.त्यांचा १ नातू तुषार वायदंडे याची नुकतीच राष्ट्रीय वित्तीय नियंत्रण संस्था कॅग मध्ये राजपत्रित अधिकारी पदी निवड झाली आहे.सामान्य कुटुंबातून तिन्ही मुले,दोन मुली यांच्या जीवनाला त्यांनी यशस्वी दिशा दिली.त्यांच्या जाण्याने येवती पंचक्रोशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!