March 26, 2026

रामलीला वरील पेन्शन रॅलीत सहभागी व्हा! -मंगेश धनवडे

0
IMG-20230825-WA0035

रामलीला वरील पेन्शन रॅलीत सहभागी व्हा! – जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,

या वर्षात सरकारला निर्णय घ्यावाच लागेल.

कोल्हापूर/मारुती फाळके

एक ऑक्टोबरला दिल्ली येथे रामलीला मैदानावर होणाऱ्या देशव्यापी पेन्शन रॅलीत कोल्हापूर जिल्ह्यातून बहुसंख्येने सरकारी कर्मचारी-शिक्षकांनी उपस्थित राहावे, यासाठी जिल्हा – तालुका – केंद्र स्तरावर, प्रत्येक मुख्यालयाच्या ठिकाणी जनजागृती करण्यात यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी कोल्हापूर times 24 शी बोलताना केले.

 

ते म्हणाले नुकतीच पुणे विभागातील पदाधिकाऱ्यांची या आंदोलना बाबत नियोजन बैठक पार पडली आहे,लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष- पदाधिकारी यांची नियोजन बैठक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. जुनी पेन्शन मिळेपर्यंत विविध आंदोलने,उठाव करत पेन्शन चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले,येणारे 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून या २०२३ सरकारला पेन्शन बाबत निर्णय घ्यावाच लागेल.यासाठी या वर्षात केंद्र – राज्य – जिल्हा व तालुका पातळीवर अनेक आंदोलने करावी लागणार आहेत., त्यासाठी प्रत्येक एनपीएस धारकापर्यंत पोहोचून जनजागृती करावी व्होट फॉर ओपीएस मोहीम ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,अन्य केडरच्या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी.

 

राज्य सहकोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील म्हणाले, इतर. केडरचे सर्व कर्मचारी यांना सर्व स्तरावर प्रबोधन करून सहभागी करून घ्यावे, इतर सर्व केडरचे कर्मचारी यांना जुनी पेन्शनच्या चळवळीत सक्रिय सहभाग करण्यासाठी जिल्हा -तालुका -केंद्र स्तरावरील कार्यकारिणीने सक्रिय होण्याबाबत जाणीव जागृती करून द्यावी, यावेळी सर्व तालुका कार्यकारिणींनी आपल्या जमाखर्चाचा हिशोब जिल्हा कार्यकारिणीकडे सादर करावा.,

यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस विजय रामाने म्हणाले, रामलीला वरील पेन्शन रॅली ही आता निकराची लढाई आहे सरकारने आश्वासने आणि दिशाभूल करण्याची परिस्थिती संपली आहे.यासाठी प्रत्येक एनपीएस धारकाने या लढ्याला बळ देण्यासाठी आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे म्हणाले,पेन्शन चळवळ ही आता चळवळ न राहता एक ऐतिहासिक लढाई सुरू झाली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी मंडळींना हा प्रश्न दुर्लक्ष करून चालणार नाही ,राज्य सरकारी कर्मचारी यांच्या या न्यायय मागणीची सरकारला दखल घ्यावीच लागेल.

यावेळी बोलताना जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे म्हणाले,रामलीला वरील पेन्शन रॅली ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येक पेन्शन शिलेदारांने झोकून देऊन काम करावे.यावेळी
सर्व जमाखर्चाचा हिशोब जिल्हा सरचिटणीस निलेश कारंडे यांनी मांडला.,

 

यावेळी शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, म.राज्य जुनी पेन्शन संघटनेचे  जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,जिल्हा सरचिटणीस विजय रामाने यांच्यासह विश्वनाथ बोराटे, गजानन कुंभार,प्रमोद पाटील,सतीश रणशिंगे,प्रकाश भोसले, रामेश्वर विभुते, जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके, जिल्हा कार्यकारिणी सुनील पाटील, सनी सुतार, नितीन जगताप, सुनील शिरसाठ, यांच्यासह मार्गदर्शक राहुल कांबळे, संजय भोसले, बी एल कांबळे, दीपक गायकवाड,संतोष जुगळे, संजय पाटील,महिला कार्यकारणी जिल्हाध्यक्ष आरती पवार,जिल्हा सरचिटणी स संगीता कडूकर,यांच्यासह सर्व जिल्हा कार्यकारणी,जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!