शिक्षक बँकेवरील पालक अधिकारी नेमणूक रद्द -सुनील एडके
शिक्षक बँकेवरील पालक अधिकारी नेमणूक रद्द, ९ महिन्यातील पारदर्शी,काटकसरीच्या कारभाराची पोचपावती
कोल्हापूर/मारुती फाळके :
राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीची सत्ता येताच अवघ्या २ महिन्यात ‘प्राथमिक शिक्षक बँकेवर सहकार विभागाकडून झालेली पालक अधिकारी नेमणूक ९ महिन्याच्या काटकसरीच्या,पारदर्शी यशस्वी कारभारामुळे रद्द झाली असून जिल्हा उपनिबंधकांकडून पालक अधिकारी नेमणूक रद्द करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील एडके व् उपाध्यक्ष शिवाजी बोलके यांनी दिली.
अध्यक्ष एडके म्हणाले, ‘यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या काळात बँकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने झाला होता. तरतुदी न करता नफा दाखविला होता. कर्ज वसुलीकडे दुर्लक्ष होते. परिणामी बँकेचे मूल्यांकन घसरले होते. यामुळे सहकार विभागाने सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांची बँकेवर पालक अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. दरम्यान गेल्या वर्षी शिक्षक बँकेत सत्ता परिवर्तन झाले. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीकडे सभासदांनी सत्ता सोपविली.
बँकेत सत्ता परिवर्तन झाल्यापासून संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार केला. खर्चावर मर्यादा आणल्या. पालक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांच्या विश्वासास पात्र राहिल असे कामकाज केले. कर्ज वसुली प्रक्रिया वाढवली. या साऱ्यांचे फलित म्हणजे बँकेचे मानांकन सुधारले. बँकेचा नेट एनपीए कमी झाला.’
या पत्रकार परिषेदला बँकेचे चेअरमन सुनील एडके व व्हाइस चेअरमन शिवाजी बोलके शिक्षक बँकेवरील पालक अधिकारी नेमणूक रद्दयांनी स्वागत केले.यावेळी संचालक,माजी चेअरमन अर्जुन पाटील, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्र पाटील, शिवाजी रोडे-पाटील, बाळकृष्ण हळदकर, नंदकुमार वाईंगडे, बाबुराव परीट, अमर वरुटे, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, माजी व्हा.चेअरमन पद्मजा मेढे, सुरेश पाटील, अर्जुन जानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मगदूम आदी उपस्थित होते.










