शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी राबवावी- शिक्षक संघाची मागणी
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी राबवावी- शिक्षक संघाची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी राबवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्याकडे करण्यात आली.
सरकारने, नव्याने शिक्षक भरती केली आहे. नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हाअंतर्गत बदल्या कराव्यात असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व शिक्षकांना विनंती बदलीसाठी संधी द्यावी.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया राबवावी, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात यावे अशा मागणी करण्यात आल्या.
प्रमोशन प्रक्रिया व विषय शिक्षक रिव्हर्शन याबाबत ही यावेळी चर्चा झाली.
शिक्षक संघाचे राज्य सल्लागार तथा माजी राज्याध्यक्ष, राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एस.पाटील,कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार,महिला जिल्हाध्यक्ष श्वेता खांडेकर,मारुती गोडसे उपस्थित होते.,या बदली प्रक्रियेसाठी राजाराम वरुटे यांनी राज्यस्तरावर सुद्धा पाठपुरावा केला आहे.










