March 24, 2026

अभूतपूर्व उत्साहात अलाटवाडी शाळेचे स्नेहसंमेलन!

0
IMG-20240313-WA0043

अभूतपूर्व उत्साहात अलाटवाडी शाळेचे स्नेहसंमेलन

पट्टणकोंडोली/मारुती फाळके

ऐतिहासिक गाणी, विनोदी किस्से,समाज प्रबोधनात्मक संदेश असणाऱ्या गाण्यातून नृत्याविष्कार सादर करत उपस्थित प्रेक्षकांना सामाजिक सुधारणा आणि मनोरंजनाचा संदेश देत विद्या मंदिर अलाटवाडी या जिल्हा परिषद शाळेचे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

गणेशवंदना,ऐतिहासिक गाणी, स्टँड अप साँग,थीम सॉंग या गाण्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन आपल्या पाल्यांचे कौतुक करताना दिसले.भव्य दिव्य शिवछत्रपतींचा महिमा पाहताना प्रेक्षक आंतरमुख झाले.,कार्यक्रमात मनोरंजनात्मक आणि समाज प्रबोधनपर अनेक बहारदार नृत्य सादर करत अलाटवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रसिकांना २ तास खिळवून ठेवले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी शैलेजा उर्फ राधिका कडेकर , तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या यशश्री मसूरकर, युवा उद्योजक डॉ. मच्छिंद्र जाधव ,ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पोवार, शरद पुजारी, तेजस्विनी जाधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सयाजी शिंदे,अनिकेत चव्हाण, जीवन शिंदे,अनिल पवार, राम शिंदे, मारुती चव्हाण, कृष्णात शिंदे, बाबासो उपाध्ये,शिवाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस साखरे,आरती पाटील यांनी तर आभार अध्यापिका संगीता कोळी यांनी मानले.

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार माने,अध्यापिका संगीता कोळी,नृत्यदिग्दर्शक यांनी परिश्रम घेतले.याकामी गावचे सरपंच ,उपसरपंच, सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य.,विविध सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य,तरुण मंडळे, शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे सहकार्य मिळाले.

यावेळी पट्टणकोंडोली केंद्राचे केंद्रप्रमुख राजेश पाटील, केंद्रमुख्याध्यापक भूपाल मंडगे, शिक्षक वजीर माणकापुरे, दत्ताजीराव जाधव हायस्कूल मुख्याध्यापक सुधीर नलवडे,शिक्षक सुहास कदम,सीताराम मोरे,सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सयाजी शिंदे , जीवन शिंदे , राम शिंदे , अनिकेत चव्हाण मारूती चव्हाण अनिल पोवार बाबासो उपाध्ये शिवाजी शिंदे कृष्णात शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

(फोटो ओळी- विद्या मंदिर अलाटवाडी शाळेच्या स्नेहसंमेलनात बोलताना शिक्षणप्रेमी शैलजा उर्फ राधिका कडेकर,बाजूस राजेश पाटील,सुधीर नलवडे,सुहास कदम,विजयकुमार माने व मान्यवर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!