March 24, 2026

सामाजिक बांधिलकी आणि समाजभान जपणारे डॉ.प्रविण कोडोलीकर.

0
IMG-20240514-WA0034

सामाजिक बांधिलकी आणि समाजभान जपणारे डॉ.प्रविण कोडोलीकर.
समाजाला दिशा देणारे बहुजन नेतृत्व!

कोल्हापूर/मारुती फाळके

आचार विचारांचा अद्वैत फार कमी माणसांना जमतं आणि ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीचं भान असणं आवश्यक असतं. जीवनमूल्ये, नीतिमूल्ये, संस्कार मूल्ये यांचा अंगीकार करत असताना समाजामध्ये काहीतरी करू पाहण्याची उर्मी येथे ती अशा जीवनसंस्कारातूनच! मग कवी बा.भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती या ठिकाणी सार्थ ठरतात जीवन त्यांना कळले हो! मी पण ज्याचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो! जीवन त्यांना कळले हो !!
आयुष्याची पाऊलवाट चालत असताना वाटेत अनेक खाचखळगे आले, पायाला ठेचा लागल्या, दगड धोंड्याचा सामना करावा लागला ,पाय रक्तबंबाळ झाले तरीही कधीही न डगमगता निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी आणि माझ्याबरोबर माझ्या भवतालाचा समाज, समाजातील भावंड येणारी नवी पिढी यांना दिशा देण्यासाठी नेहमीच मार्गदर्शकाची आणि पाठीराख्याची भूमिका उठवणारे म्हणजे शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक आणि शिव महोत्सवाचे संकल्पक डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा……

खरंतर प्रत्येकाची जगण्याची अशी काही एक सचोटी आणि जीवनशैली ठरलेली असते पण समाजामध्ये काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत माणसं समाजाला वाहून घेऊन प्रत्येक कृती ही समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न करत असतात; अशाच पुरोगामी विचारांच्या वाटचालीतले कार्यप्रवण आणि क्रियाशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. प्रवीण कोडोलीकर.
सतत आपल्या सहवासात आलेला विद्यार्थी, कार्यकर्ता, शिवाजी विद्यापीठाच्या संबंधित येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील आजी-माजी विद्यार्थी यांच्या समस्या सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणे, शिव-शाहू- फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणे .कोल्हापूर शहरांमध्ये अनेक सामाजिक संवेदनाच्या उपक्रमामध्ये पुढाकार घेऊन त्या उपक्रमांना पाठबळ देणे आणि ते उपक्रम पुढे होऊन यशस्वी करणे हे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांची हातोटी आणि सचोटी. लहानपणातच आई वडिलांचे छत्र हरवलेल्या डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास. सहवासात आलेल्या प्रत्येक वाटाड्याने प्रवीण कोडोलीकर सरांना दिशा दिली आणि जीवनाचे खरे मर्म शालेय वयातच त्यांच्याकडे आले.समजूतदारपणाचे संस्कार आले, आणि मग आपसूकच समाजाला दिशा देण्याची, स्वतः घडण्याची प्रक्रिया सुरू झाली.

पश्चिम महाराष्ट्र च्या कानाकोपऱ्यातून शिवाजी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊन पाहणाऱ्या आणि मनामध्ये नवसमाज निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो पोरांची विजयगाथा आपण ऐकली आहे पण त्या शेकडो पोरांच्या विजयगाथेचा एकमेव नायक म्हणजे डॉ. प्रवीण कोंडोलीकर अर्थात अनेक बहुजन युवकांना दिशा दाखवणारा अवलिया व्यक्तिमत्त्व!आजी माजी विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या परिघामध्ये असे व्यक्तिमत्त्व आपल्याला नक्की सापडणार नाही.

 

सांगली जिल्ह्यात जन्म झालेल्या डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचे वडील शासकीय सेवेमध्ये असल्यामुळे अर्थातच कोल्हापूरला बदली झाल्यानंतर कोल्हापूरचा रांगडा बाज जपणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असणाऱ्या शिवाजी पेठेत बालपण आणि शिक्षण झालेल्या डॉ. कडोलीकर यांचे माध्यमिक शिक्षण आंतरभारती विद्यालय विचारे माळ या ठिकाणी झाले. सहाजिकच आंतरभारती विद्यालयामध्ये असताना सहावी सातवीपासून राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झालेल्या डॉ. कोडोलीकर यांनी विद्यार्थीदशेतच राष्ट्रसेवा दलाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथक माध्यमातून भारतभर प्रबोधनाचे कार्यक्रम केले.

अवघ्या २२ ते २४ वर्षांचे असताना आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण आणि विद्यापीठात स्वतःच्या यशाची घोडदौड चालू ठेवली. विद्यापीठामध्ये आल्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कार्याचा प्रभाव असल्यामुळे अर्थातच संशोधनासाठीचा विषय म्हणून “राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्रातील योगदान” या आशयाच्या विषयावर पीएचडी साठीचा प्रदीर्घ असा शोधप्रबंध लिहिला, नंतर काहीच वर्षात तो शब्द प्रबंध पुस्तक रूपाने सुद्धा प्रसिद्ध केला. या ग्रंथाला ग.प्र. प्रधान यांची प्रस्तावना लाभली आहे. राष्ट्रसेवा दलातील अनेक नेत्यांचा डॉक्टरांना जवळून सहवास लाभल्यामुळे त्यांचे संस्कार डॉक्टरांनी उमेदीच्या वयातच ग्रहण केले.

विद्यापीठातील या कारकिर्दीची सुरुवात खऱ्या अर्थाने एम. फिल पीएच. डी धारकांच्या प्रश्नावरून सुरू झाली. जवळपास महिन्याभराच्या लाक्षणिक उपोषणानंतर शासनाला या उपोषणाची दखल घ्यावी लागली. २००९ मध्ये आंदोलन कर्त्यांचा प्रश्न निकालात निघून त्यांना शासनाकडून न्याय देण्यात आला. यात डॉ.प्रवीण कोडोलीकर यांचे योगदान ठळक अक्षराने अधोरेखित आहे.

विद्यापीठात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोज वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतात. मात्र त्या प्रश्नांवर कोणाला भेटावे आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन मागावे याबद्दलचे फारसे ज्ञान नसल्यामुळे ते विद्यार्थी संकुचाने दडपणाखाली येतात या सर्व विद्यार्थ्यांना दिशा मिळण्यासाठी काही वर्षापूर्वी डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या प्रयत्नातून आजी -माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांपासून सध्याच्या आजी विद्यार्थ्यांच्या पर्यंत सर्वांसाठी हा स्नेह मिळावा गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर सुरू आहे. नंतरच्या काळात याच आजी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कृती कार्यक्रमाला “माजी विद्यार्थी कृती समिती शिवाजी विद्यापीठ” असे नाव देऊन एक संस्था विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम सज्ज आहे. करण्यासाठी सुसज्येसाठी आज मी तिला शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणारी ही संस्था आणि संघटना सगळ्यात मोठी संघटना म्हणावी लागेल. या सर्व कामासोबतच सामाजिक क्षेत्रात ज्या ज्या वेळी जे जे करावे लागत असेल त्या त्या ठिकाणी डॉक्टर सदैव तत्पर राहिले आहेत.

शिव फुले शाहू, आंबेडकरी विचारधारा जोपासत असताना आजी-माजी विद्यार्थी मेळावा नंतरच्या काळात शिव महोत्सव म्हणून लोकप्रिय झाला. विद्यापीठाच्या प्रांगणात ज्यानी शिक्षण घेतले अथवा अध्यापन केले त्या गुरूंचा सन्मान आणि विद्यापीठाच्या मुशीतून तयार झालेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव या शिवमहोत्सवातून गेल्या अनेक वर्षे होतो आहे.

२०१९ मध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या भयानक लाटेमध्ये जवळपास ९४५ कुटुंबांना किमान दोन महिने पुरेल इतके धान्य आणि कौटुंबिक उपयोगाचे साहित्य डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. २०१९ आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराचे भीषण संकट उभे राहिले या काळात डॉक्टर आणि त्यांच्या टीमने महापुरात अडकलेल्या अनेक कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण अवलंबले. या सर्व कामांमध्ये त्यांच्या अर्धांगिनी योगिता कोडोलीकर आणि प्रयोदी फौंडेशन आहेच. अर्धांगिनी योगिता मॅडम यांचे पाठबळ उल्लेखनीय राहिले आहे. या सर्व सामाजिक कामांना एक संस्थात्मक रूप देण्यासाठी योगिता ताई यांनी प्रयोदी फाउंडेशनची स्थापना केली. डॉक्टर आणि ताई आजही या माध्यमातून कष्टकरी कामगार,स्त्रिया, प्रवाहातून बाजूला राहिलेल्या लोकांसाठी काम करतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला असताना त्यांचाही कुठेतरी सन्मान झाला पाहिजे या भावनेतून दरवर्षी शेकडो स्वच्छता कामगार महिलांना डॉ.कोडोलीकर कुटुंबाकडून साड्यांची भेट देऊन त्यांचा मानपान करण्यात येतो.

विद्यार्थ्यांचा प्रश्न असो वा कामगारांचे प्रश्न असो, सामाजिक बाबतीत उद्भवलेल्या काही समस्या असो अथवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील काही त्रुटी असो या सर्व पातळीवर डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. डॉ. कोडोलीकर यांच्या मित्र परिवाराकडे पाहिले असता अनेक मित्र शासकीय पातळीवर दिग्गज अधिकारी तर आहेतच पण त्यासोबतच अनेक व्यावसायिक, उद्योजक, राजकारणी यांचा सुद्धा मोठा गोतावळा डॉ. कोडोलीकर यांच्यासोबत आहे. त्यांच्यात सुद्धा कधीकधी कुठलाही प्रश्न अथवा समस्या उभी राहिली तर एकच पर्याय समोर असतो तो म्हणजे डॉ.प्रविण कोडोलीकर.

म्हणून डॉ.प्रविण कोंडोलीकर यांच्या विषयी एवढेच म्हणावेसे वाटते,

बहुजनांचा लोकसेवक……डॉ.प्रविण कोडोलीकर.

शाहू च्या मातीत जणू
हिरा कोहिनूर जन्मला
प्रविण कोडोलीकर सरांच्या रूपाने
खरंच बहुजन समाजाला वाटाड्या लाभला.

बहुजन युवकांना दिली दिशा
दाखवली ज्ञानाची गंगा
वैविध्यपूर्ण उपक्रमांनी
दाखविले कर्तुत्व जगा

सिद्धहस्तलेखक म्हणून
वाढविली लेखनीची उंची
तमाम बहुजन मनात
रुजवली पुरोगामी विचारांची पेरणी

अष्टपैलू व्यक्तिमत्वाने
फुलविली माणुसपणाची बाग
डॉ.प्रवीण कोडोलीकर म्हणजे
जणू शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसदार

या वाढदिनाच्या प्रसंगी
आणखी काय मागावे
माणूसपणाचा जिवंत झरा असणाऱ्या प्रवीण सरांना
आयुष्य शतकी लाभावे!!

शिव महोत्सव सोहळा आणि अन्य समाजबांधणीच्या उपक्रमांनी केला आहे जागर
प्रविण सर,
तुम्हीच आहे परिवर्तनवादी
विचारांचे आगर!
परिवर्तनवादी विचारांचे आगर!!

————————————————————-
विद्यार्थ्यांतील कलाकाराला व्यासपीठ देणारे प्रवीण कोडोलीकर.

प्रसंग आहे २०१५ साल चा. तशी माझी कलेच्या क्षेत्रातील नवीनच सूरवात होती,कोल्हापुरातील अनेक छोटे स्टेज चे कार्यक्रम करत होतो ,एक दिवस माझे मित्र अंजिक्य शिंदे आणि श्वेता परुळेकर यांनी मला डॉ. प्रवीण कोडोलीकर सरांची ओळख करून दिली. तशी डॉ प्रवीण सर व माझी पहिलीच भेट. मी काय करतो,कसली आर्ट आहे हे त्यांना ही माहित नव्हते.तरी देखील मला त्यांनी शिवमहोत्सवं २०१५ च पाहिलं व्यासपीठ दिले.त्यावेळी त्यांची थीम होती.स्त्री शक्तीचा आदर आणि वंदन करणे. त्यावेळी मी पहिला स्त्रीभ्रूण हत्येवरील प्रसंग सँड आर्ट च्या माध्यमातून दाखवला.आजवरच्या सादरीकरणात पहिलावहिला १००० संख्येच्या समूहापुढे खुले सादरीकरण केले होते.त्यानंतर खऱ्या अर्थाने सँड आर्टिस्ट ही ओळख माझी निर्माण झाली.सँड आर्ट ची जी पेटी होती ती खुप साध्या पद्धतीची होती ,अमित तुझं करिअर यातच आहे; ही कला तु सोडू नकोस तुला जेवढी मदत लागेल तेवढी मी करायला तयार आहे असे सांगून मला नवीन सँड आर्ट बॉक्स बनविण्यासाठी आर्थिक सहकार्य केले, हा माझ्या,आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता माझी सुरवात एकीकडून होत होती. पण चांगल्या प्रतीचा चा बॉक्स बनवण्यासाठी माझ्या जवळ तेवढे पैसे ही नव्हते. मला सरांनी अशा काळात मदत केली तो काळ संघर्षाचा होता.माझ्या कलेचं चीज म्हणून,उभरत्या वयात या वर्षी झालेल्या शिवमहोत्सव २०२४ मध्ये मला शिवपुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशा माझ्या प्रेरणास्थान असलेल्या माझ्या गुरवर्य डॉ.प्रवीण कोडोलिकर यांच्या ऋणात राहणे पंसंत करतो.
डोळ्यात समाधान आणि कृतज्ञतेची भावना साठवून ओथंबलेल्या डोळ्यांनी कोल्हापूरातील आघाडीचा सँड आर्टिस्ट अमित सविता उत्तम माळकरी कोडोलीकर सराविषयी भरभरून बोलत होता.जो अमित माळकरी आज कलर्स मराठी, झी मराठी सारख्या अनेक अभिनव कार्यक्रमाच्या प्लॅटफॉर्म उभा आहे त्याचा पडत्या काळातील पाठीराखा समाजभान जपणारा डॉ.प्रविण कोंडोलीकर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!