March 24, 2026

स्व.दत्ता घाटगे परिवाराच्या पाठीमागे ताकदीने उभा – आम.विनय कोरे

0
IMG-20240608-WA0063

स्व.दत्ता घाटगे परिवाराच्या पाठीमागे ताकदीने उभा – आम.विनय कोरे

माजी जि प सदस्य दत्ताजीराव घाटगे यांचा स्मृर्तीदिन विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर/मारुती फाळके

मिणचे ता. हातकणंगले येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. दत्ताजीराव घाटगे यांचा १ला स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
दत्ताजीराव घाटगे हे लोकांचे नेते होते. सर्वसामान्य जनतेची सेवा करून आपल्या पदाचा वापर त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केला. त्यांची उणीव नेहमीच जनसुराज्य शक्ती पक्ष व कार्यकर्त्यांना जाणवेल. त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा राहिन, असे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केले.

घाटगे सर यांच्या स्मृतीदिनी राबविण्यात आलेले विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आ.कोरे म्हणाले.
यावेळी दत्ताजीराव घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच वृक्षारोपण, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर , दहावी बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.पांजरपोळ येथील जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी समाजकल्याण सभापती विशंत महापुरे , माजी जिल्हा परिषद सदस्या मंदा दत्ताजीराव घाटगे,माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, माजी उपसरपंच राज घाटगे, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रियांका घाटगे – गवळी,
काँग्रेसचे सरचिटणीस प्रल्हाद घाटगे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश घाटगे
यांची प्रमुख उपस्थिती होती
गणेश घाटगे, तातोबा घाटगे, शरद घाटगे ,अनिकेत सदाकाळे आदीसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार डॉ दिग्विजय गवळी यांनी मानले .

(फोटो ओळी-माजी जि प सदस्य कै.दत्ताजीराव घाटगे यांच्या प्रथम स्मृतिदिन निमित्त आयोजित दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव,
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्या मंदा घाटगे, राज घाटगे व इतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!