March 18, 2026

आमचं ठरलंय एक इंचही जागा देणार नाही..१४ तारखेला गाव बंदची हाक!-हद्दवाढ विरोधी कृती समिती

0
IMG-20240710-WA0057

आमचं ठरलंय! एक इंचही जागा देणार नाही..१४ तारखेला गाव बंदची हाक!-हद्दवाढ विरोधी कृती समिती

हद्दवाढ रद्द न केल्यास १९ गावे नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

उजळाईवाडी/मारुती फाळके

कोल्हापूर हद्दवाढीत गावांना न विचारता पालकमंत्री हद्दवाढ करतातच कशी? शहरांच्या विकासासाठी ४२ गावांसाठी नेमलेल्या प्राधिकरणाने कोणता विकास केला. आमची गावे सक्षम आहेत. आम्हाला कोणाच्या हद्दवाढीची गरज नाही. आमचं ठरलंय एक इंचही जागा हद्दवाढीत जाणार नाहीत. हद्दवाढीला विरोध दर्शवत १९ गावांनी येत्या १४ तारखेला गाव बंदची हाक दिली आहे.

निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनी १९ गावच्या रहिवाश्याना विचारत न घेता पालकमंत्री कोणाच्या इशाऱ्यावर हद्दवाढ करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नसल्याचा उचगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या १९ गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, लोकप्रतिनिधी, महिला, यांनी हद्दवाढीला विरोध करीत वज्रमूठ करून एल्गार पुकारला आहे. हद्दवाढ केली तर नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

 

यावेळी सर्व पक्षीय कोल्हापूर महानगर पालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, उचगावचे सरपंच व कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, गडमुडशिंगीचे माजी सरपंच व उपसरपंच तानाजी पाटील, यांच्यासह अन्य १९ गावातील प्रमुख सरपंचांनी मनोगत व्यक्त करीत हद्दवाढीला विरोध दर्शवला आहे.

यावेळी कार्याध्यक्ष सरपंच उत्तम आंबवडे यांनी प्रास्ताविक केले, सामाजिक कार्यकर्ते किरण आडसुळ यांनी स्वागत केले.
उपाध्यक्ष नारायण गाडगीळ ( पाचगाव),अमर मोरे- मा. सरपंच (मोरेवाडी),सरपंच सुमन गुरव(कळंबा) , सरपंच प्रियांका पाटील (पाचगाव),मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कंदलगाव सरपंच राहुल पाटील,गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे,गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे,
सरनोबतवाडी सरपंच शुभांगी आडसुळ,गडमुडशिंगी सरपंच अश्विनी शिरगावे,उपसरपंच तानाजी पाटील, वळीवडे उपसरपंच भैया इंगवले, शिरोली सरपंच करपे मॅडम,शिये सरपंच शीतल मगदूम, वडणगे सरपंच संगीता पाटील,आंबेवाडी सरपंच सुनंदा पाटील,नागदेववाडी सरपंच रवींद्र पोतदार, बालिंगा माजी सरपंच मयूर जांभळे, पिरवाडी सरपंच शुभांगी मिठारी,
माजी कावजी कदम, शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव, गाव प्रमुख दीपक रेडेकर, माजी सरपंच अनिल शिंदे, राजेंद्र संकपाळ, उपसरपंच तुषार पाटील, यांच्यासह दिडशे ते दोनशे ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट:
कोल्हापूरची गेली ५० वर्ष हद्दवाढ झाली नाही.
कोल्हापूरचा विकास झाला नाही. कोल्हापूर शहराला मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. जर हद्दवाढ लादली तर आक्रोश मोर्चा काढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही.

उत्तम आंबवडे कार्याध्यक्ष
सरपंच उजळाईवाडी

कोट:
शहरातील झूम सारखे प्रकल्प रेंगाळले, अनेक रस्त्याची अवस्था दयनीय आहे. हद्दवाढ विरोधात येत्या १४ तारखेला गाव बंदची हाक दिली आहे.

मधुकर चव्हाण अध्यक्ष
सरपंच

कोट:
१५ व्या वित आयोगातून गावचा विकास होत आहे. हद्दवाढ कदापि होऊ देणार नाही.
प्रियांका पाटील
सरपंच पाचगाव

कोट:
गावे विकासाच्या वाटेवर आहेत. ग्रामपंचायत ग्रामस्थांची सर्व कामे तातडीने करीत आहेत. त्यामुळे हद्दवाढ नकोच आहे.

अश्विनी शिरगावें
सरपंच, गडमूडशिंगी

कोट:
गाव स्तरावर अनेक विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. लोकांची अडवणूक कोठेच होत नाही. हद्दवाढ नकोच आहे.

शुभांगी आडसुळ
सरपंच, सरनोबतवाडी

कोट
वाढते नागरीकरण व शहराला मुबलक सुविधा देणे महापालिका प्रशासनाला अजूनही शक्य नाही तिथे गावांना सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासनाची अवस्था काय होईल?गावगाड्यात अजूनही सुखी,समृद्ध लोक नांदत आहेत,गावचे गावपण अबाधित राहण्यासाठी हद्दवाढीला कायम विरोध राहील.
–तानाजी पाटील
उपसरपंच गडमुडशिंगी

फोटो ओळ :
उचगाव येथे सर्व पक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने हद्दवाढीला विरोध वज्रमूठ आवळून निषेध नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!