March 18, 2026

वि. म. सावरवाडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

0
IMG-20240719-WA0009

वि. म. सावरवाडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

कोल्हापूर/मारुती फाळके

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या मंदिर सावरवाडी ता.करवीर शाळेचे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकून शिष्यवृत्तीधारक बनले.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेने शिष्यवृत्ती परिक्षेमधील यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
जिल्हा गुणवत्ता यादीत यशस्वी विद्यार्थी-

१ अथर्व दत्तात्रय दबडे – 260 गुण
२. कु. अमृता रंगराव खोत 256

यशस्वी गुणांकन मिळवलेले विद्यार्थी-
१.रितिका सागर कंदले 240
२.श्रेयस अर्जुन तांदळे 238
३.कीर्ती कृष्णात सुतार 222
४.सिद्धी नवनाथ जाधव 214

शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षिका सारिका अमोल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशात शाळेचे मुख्याध्यापक बबन गावडे,केंद्रप्रमुख मारुती दिंडे,
गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, करवीर पंचायत समिती शिक्षण विभागाचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,सर्व शिक्षक स्टाफ वि.मं.सावरवाडी ,शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक , ग्रामस्थ सावरवाडी यांचे प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!