पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी
पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदीनिशी- आमदार जयंत आसगावकर
कोल्हापूर/मारुती फाळके
सर्व शासकिय व निमशासकिय कर्मचारी संघटनांच्या समन्वयाने व सहभागाने शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी उतरणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन सभागृहामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ अशी संयुक्त बैठक झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. मागील दहा वर्षात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारे चालू असलेला लढा सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशा निर्णायक वळणावर १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोरदार आक्रोश व्यक्त करण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी १७ रोजी १२ वाजता टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा निघेल.
बैठकीला शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, एम. जी. पाटील, आर. डी. पाटील, शिवाजीराव भोसले, विनोद पाटील, मनोहर जाधव, मारुती फाळके,मंगेश धनवडे, संतोष गायकवाड, सुदेश जाधव, अमर वरुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.










