March 24, 2026

पेन्शन क्रांती महामोर्चात सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे-भरत रसाळे

0
IMG-20240816-WA0136

पेन्शन क्रांती महामोर्चात सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे-भरत रसाळे

कोल्हापूर/प्रतिनिधी

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात जिल्ह्यातील खाजगी शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केलेले आहे .काढणार आहे हा महामोर्चा शनिवारी , १७ ऑगस्ट रोजी टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील खाजगी शाळातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा सुटल्यानंतर शंभर टक्के या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रसाळे यांनी केले आहे .
शिक्षक आणि सरकारी – निम सरकारी कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे . महाराष्ट्र शासन सुधारित पेन्शन योजनेच्या नावाखाली फसवी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्यावर माथी मारु इच्छित आहे . हे आम्हा शिक्षक – कर्मचाऱ्यांना सगळ्यांना मंजूर नाही .१९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू व्हावी म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये अनेक वेळा आंदोलने झालेली आहेत .पण शासन याची दखल घेत नाही .त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे . हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू होण्यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!