पेन्शन क्रांती महामोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा- राजेंद्र कोरे
पेन्शन क्रांती महामोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा- राजेंद्र कोरे
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आव्हान महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव यांनी केलेले आहे . शनिवारी १७ ऑगस्ट रोजी टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील प्खाजगी प्राथमिक शाळातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्र कोरे यांनी केले आहे .
राज्यातील शिक्षक आणि सरकारी – निम सरकारी कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे . महाराष्ट्र शासन सुधारित पेन्शन योजनेच्या नावाखाली फसवी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्यावर माथी मारु इच्छित आहे . हे आम्हा शिक्षक – कर्मचाऱ्यांना सगळ्यांना मंजूर नाही .१९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू व्हावी म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये अनेक वेळा आंदोलने झालेली आहेत .पण शासन याची दखल घेत नाही .त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे . हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू होण्यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे.










