२५ सप्टेंबर चे आंदोलन जिल्ह्यात यशस्वी करण्याचा सर्व शिक्षक संघटनांचा निर्धार
२५ सप्टेंबर चे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी करण्याचा सर्व शिक्षक संघटनांचा निर्धार
प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर
कोल्हापूर/मारुती फाळके
राज्य शासनाने शिक्षक संचमान्यतेबाबत १५ मार्च रोजी काढलेला आदेश व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा ५ सप्टेंबर रोजी काढलेला आदेश दुर्गम भागातील वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत. या मागणीसाठी बुधवार, दि. २५ रोजी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत करण्यात आला होता.
शासनाच्या या अन्यायकारक दोन्ही निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होऊन सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे शासनाने हे आदेश तत्काळ मागे घ्यावेत,या मागणी बाबतचे निवेदन २५ सप्टेंबर चे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने होत असल्याचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
मोर्चा बाबतचे निवेदन आज मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.शिक्षणाधिकारी यांना निवेदन शिक्षक नेते मोहन भोसले, देताना राजाराम वरूटे, प्रसाद पाटील, शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, पुरोगामीचे जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील, कार्स्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डूकर, पदवीधर शिक्षक संघटेचे उपाध्यक्ष संजय जगताप, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार, शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, प्रशांत पोतदार, सुरेश हुली, दिनकर पोवार, बाळासाहेब कोठावळे, बाळासाहेब कांबळे आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
चौकट-
असे असेल आंदोलनाचे स्वरूप
—————————————–
(१) दि.१७/०९/२०२४ पासून.. न्याय मिळेपर्यत काळी फीत लावून विरोध प्रदर्शन.*
(२) राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक तथाकथित सर्व प्रशासनिक WhatsApp Group वरून बाहेर पडून असहकार सुरू करतील. Online कोणतीही माहिती देणार नाहीत.*
(३) बुधवारी दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी किरकोळ रजा घेऊन पालकांसह प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर १००% शिक्षकांचा महामोर्चा काढला जाईल.
फोटो ओळी- २५ सप्टेंबर च्या आंदोलनाचे निवेदन देताना सर्व संघटना प्रतिनिधी










