खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस २ कोटी ४५ लाख नफा -चेअरमन सूर्यकांत बरगे
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस २ कोटी ४५ लाखावर नफा-चेअरमन सूर्यकांत बरगे
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या श्रीराम हॉल कसबा बावडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सूर्यकांत बरगे होते संस्थापक व संचालक श्री भरत रसाळे यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना चेअरमन सूर्यकांत बरगे म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात पतसंस्थेस विक्रमी दोन कोटी ४५ लाखावर नफा झाला आहे सभासदांना १५ टक्के लाभांशाबरोबरच २८% सभासद भेट असे एकूण ४३% लाभ सभासदांना दिला जाणार आहे त्याचबरोबर दिवाळी भेट म्हणून सभासदांना गोकुळचे अर्धा लिटर तूप ही दिले जाणार आहे. चालू वार्षिक वर्षात सभासद कुटुंब कल्याण योजना सुरू केली आहे या योजनेतून सभासदांना ३५ लाखापर्यंत रिस्क कव्हर मिळणार आहे .या योजनेस सहकार खात्याची मंजुरीही घेतली आहे. उत्तरोत्तर पतसंस्थेने भरीव कामगीरी करून ४५० कोटींची उलाढाल पूर्ण केली आहे. सभासदांना ४५ लाखापर्यंतचे कर्ज दिले जात असून त्या कर्जावरील व्याज दर पाव टक्का कमी करून तो सव्वा नऊ टक्के केल्याची घोषणा यावेळी चेअरमन सूर्यकांत बरगे यांनी केली. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे म्हणाले की , आम्ही पतसंस्थेनचे फक्त विश्वस्त असून सभासदांच्या हितासाठी यापुढेही अधिकाधिक चांगल्या योजना राबवण्याचा मानस असलेचे सांगितले.
सेवानिवृत सभासदांना ‘ ब ‘ वर्ग सभासद करून घेऊन पाच लाख कर्ज देण्याच्या उपविधी दुरुस्तीस सर्वानुमते मान्यता दिली.
यावेळी झालेल्या कामकाजामध्ये संस्थेचे संचालक साताप्पा कासार , शिवाजी सोनाळकर , राजेंद्र कोरे ,संतोष आयरे यांच्यासह गोरख वातकर , पी .वाय . पाटील , पांडूरंग गवळी , सागर पाटील यांनी भाग घेऊन चांगली चर्चा घडवून आणली . यावेळी माजी चेअरमन शिवाजी भोसले ,संचालक सर्वश्री सौ माधुरी घाटगे, मच्छिंद्र नाळे, कृष्णात चौगले, वसंत पाटील, राजेश कोंडेकर, महादेव डावरे , सौ वर्षाराणी वायदंडे सौ रोहिणी येडगे सल्लागार समिती सदस्य सर्वश्री संभाजी सुतार ,आप्पासो वागरे ,पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर, दशरथ कांबळे व सभासद असंख्य संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वागत संचालक अमित परीट यांनी केले.सचिव साताप्पा कासार यांनी नोटीस वाचन केले तर प्रोसिडिंग वाचन कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सल्लागार समिती सदस्य सौ विद्या पाटील यांनी केले व आभार व्हाईस चेअरमन सर्जेराव नाईक यांनी मांनले.










