अजब!हारुगडेवाडीत तरुणांनी बांधले बिबट्याचे पाय!बिबट्या जेरबंद.
हारुगडेवाडीत तरुणांनी बिबट्याला केले जेरबंद.
कुत्र्यांच्या एकजुटीमुळे बिबट्याची दमछाक
भेडसगाव/मारुती फाळके
गेल्या काही दिवसापासून हारुगडेवाडी ता.शाहूवाडी येथे लपूनछपून राहिलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर ग्रामस्थांना यश आले. किरण नालुगडे,सिकंदर नालुगडे यांच्या घराशेजारील परिसरात गेले काही दिवस मादी जातीचा बिबट्या ठाण मांडून होता.झाडावर चढण्यात, लपून राहण्यात त्याची चपळाई होती.
आज घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,आज सांयकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा भुंकण्याचा मोठा आवाज परिसरात घुमू लागला,हा इतका मोठा आवाज कशाचा म्हणून गावातील तरुणांनी तिकडे धाव घेतली,पाहतात तर परिसरातील सर्व कुत्र्यांनी एकजुटीने बिबट्याचा पाठलाग सूरु केला होता.कुत्र्याच्या तावडीत बिबट्या सापडला होता.साधारण १ तास भर हा कल्लोळ चालू होता.घटनास्थळी गावातील ज्येष्ठ,तरुण पोहोचताच झाडावरून खाली पडून बिबट्या निपचित पडला असेल. गावातील तरुणांनी कुत्र्यांना बाजूला करत बिबट्याचे चारही पाय,तोंड बांधले.अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर तरुणांना यश आले.
माळवाडी परिसरामधील मधील सिकंदर नालुगडे यांच्या घराशेजारी शेतामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत होते. आज सायंकाळी साडेसात वाजता आंब्याच्या झाडाच्या परिसरामध्ये बिबट्याचा कुत्र्यांनी पाठलाग करताच बिबट्या झाडावर चढला, झाडावरून खाली पडला, यांनतर कुत्र्यांनी बिबट्याला घेराव घालून पकडले.कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून तरुणांनी वनविभागाच्या ताब्यात देऊन
बिबट्याला रेस्क्यू केले.
बिबट्याला जेरबंद करताच धाडसी युवक,ग्रामस्थांनी बिबट्याचे पाय, तोंड बांधून वन विभागास कळवले. वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचताच बिबट्याला जेरबंद करून रेस्क्यू करण्यात आले आहे.बिबट्याला बांधून ठेवण्याच्या धाडसी मोहिमेमुळे हारुगडेवाडीतील तरुण-ग्रामस्थांच्या अजब धाडसाची चर्चा परिसरात रंगली आहे.नागरी वस्तीत एखादा अनर्थ घडण्याच्या अगोदर बिबट्याचा बंदोबस्त करावा., वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.










