‘काष्ट्राईब’चे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांना मातृशोक.,शनिवारी जलदान विधी.
काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांना मातृशोक
शनिवारी जलदान विधी.
कोल्हापूर/प्रतिनिधी
काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष आणि शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन यांच्या मातोश्री
स्मृतीशेष कालकथित श्रीमाबाई तुकाराम वर्धन – आमशी
वय ७५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.या धक्क्यातून सावरत असतानाच लागोपाठ त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आहे.त्यांच्या आईच्या अखेरच्या श्वासापर्यंत गौतम वर्धन व परिवाराने आईची व्रतस्थपणे सेवा केली.काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
श्रीमाबाई वर्धन यांच्या पश्चात २मुले, मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
जलदान विधी – शनिवार ११ ऑक्टोबर रोजी जि.प.कॉलनी बोंद्रे नगर फुलेवाडी येथे होईल.










