प्राथमिक शिक्षकांचे पगार व दिवाळी अग्रीम दिवाळीपूर्वी – शरद गोसावी शिक्षक संघाच्या शि.द. पाटील गटाने घेतली भेट
प्राथमिक शिक्षकांचे पगार व दिवाळी अग्रीम दिवाळीपूर्वी – शरद गोसावी
शिक्षक संघाच्या शि.द. पाटील गटाने घेतली भेट
कोल्हापूर/मारुती फाळके
प्राथमिक शिक्षकांचे पगार व दिवाळी अग्रीम दिवाळीपूर्वी देणार असल्याचे राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शिक्षक संघाच्या(शि. द. पाटील)गटाच्या शिष्टमंडळाला ग्वाही दिली.
दिवाळीपूर्वी प्राथमिक शिक्षकांचे पगार करावेत व दिवाळी अग्रीम मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक शरद गोसावी प्राथमिक यांची भेट घेतली व निवेदन देण्यात आले.
गोसावी यांनी पगार व दिवाळी अग्रीम साठी बजेट तातडीने देण्यासाठी संबंधितांना आदेश दिले.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे पगार दिवाळीपूर्वी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याप्रसंगी शिक्षक संघाचे माधवराव पाटील, शिक्षक नेते,राजाध्यक्ष केशवराव जाधव राज्य सल्लागार राजाराम वरुटे, बाळासाहेब काळे, लायक पटेल,राज्य कार्याध्यक्ष संभाजी बापट, तुकाराम कदम, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी:
दिवाळीपूर्वी शिक्षकांचा पगार व अग्रीम मिळावे या मागणीसाठी शिक्षक संघ शि. द. पाटील गटाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी, चर्चेत सहभाग घेताना राज्याध्यक्ष केशव जाधव, राजाराम वरुटे,
माधवराव पाटील, लायक पटेल, संभाजी बापट, प्रशांत पोतदार बाजीराव कांबळे आदी.










