सुसंस्कार हायस्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
सुसंस्कार हायस्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी
कदमवाडी (भोसलेवाडी) येथील सुसंस्कार हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि सुसंस्कार हायस्कूल कोल्हापूर यांच्या संयुक्तपणे ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी सांगलीचे ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास अभ्यासक सदानंद कदम यांचे ‘वाचन: एक आनंदवाट’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रियाज मगदूम होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार विजयकुमार पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, मुख्याध्यापक विजय भोगम, सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या सचिव सौ. रुबिना अन्सारी होते.
यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हयातील निवडक पाच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. यामध्ये तात्यासाहेब कोरे ग्रंथालय जेऊर ता.पन्हाळा, पंचशील वाचनालय सरनोबतवाडी ता. करवीर, विदयासागर सार्वजनिक वाचनालय बालिंगे, ता. करवीर, साई सार्वजनिक वाचनालय ता. करवीर, कै दीपक पाटील सार्वजनिक वाचनालय हेरले ता.हातकणंगले.
कार्यक्रमास सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ. शबाना खान, अब्दुलखालीक खान, सौ. जकिया मगदूम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अरुणा हुल्ले, अमेय जोशी, सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, बाळासाहेब गवाणी पाटील, वसंत पाठक, जयसिंग जाधव, नंदकुमार डोईजड, आनंदा यादव, क्रिएटीव्ह टीचर फोरमचे दीपक जगदाळे, भीवाजी काटकर यांच्यासह जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय कळके , प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर तर आभार मुख्याध्यापक विजय भोगम यांनी मानले.










