शिक्षक समितीच्या वतीने नूतन विस्ताराधिकारी,केंद्रप्रमुख यांचा सत्कार
शिक्षक समितीच्या वतीने नूतन विस्ताराधिकारी,केंद्रप्रमुख यांचा सत्कार
कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोल्हापूर च्या जिल्हा कार्यकारणीची सभा संपन्न झाली. या सभेत संघटना बांधणीच्या व अन्य विषयाबरोबरच नूतन विस्ताराधिकारी,केंद्रप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. या सभेस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी या सभेस मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर यांनी तालुकानिहाय संघटनेच्या कामकाज विषयींचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष प्रमोद तोउंदकर म्हणाले,शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी समिती हे राज्यातील बलाढ्य संघटन असून शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे,आगामी काळात संघटना विस्तार व वाढीसाठी सर्वांनी पाठबळ द्यावे.
यावेळी नूतन केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी नारायण आयरे केंद्रप्रमुख राणेश्वर थोराबोले,प्रकाश खाडे ,भगवान चौगले,भूपाल मंडगे,अशोक भुजवडकर,श्रीकांत गुर्जर
आदी मान्यवारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले, इथून पुढच्या काळामध्ये संघटनाच प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी उभा राहील. यासाठी संगटनेमध्ये कार्यरत राहणे आणि संघटनेच्या विचाराशी एकनिष्ठ राहून संघटनेसाठी वेळ देणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांचे काम आहे,सर्वांनी मरगळ झटकून सक्रिय होण्यासाठी त्यांनी आवाहन केले.संघटनेत शिस्त पाळा. शिक्षक हितासाठी आपल्याला काम करायचं आहे. ज्या तालुका शाखेंचा कार्यकाल संपलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आपली अधिवेशने लावावी.
शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी म्हणाले,समितीच्या संघटन बांधणीसाठी व समितीचे कार्य शिक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे.
करवीर मध्ये संघटना सभासद जवळपास चारशे लोक झाले आहेत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करत आहोत.
जिल्हाध्यक्ष प्रमोद तौनंदकर म्हणाले,शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी समिती हे राज्यातील बलाढ्य संघटन असून शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे,आगामी काळात संघटना विस्तार व वाढीसाठी सर्वांनी पाठबळ द्यावे.जिल्हा शाखा सदैव कामात आहे. शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आणि जिल्हा परिषद मध्ये जात असतो.विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख पदोन्नती घेत असताना शिक्षक समितीचे प्रयत्न बहुमत ठरले आहेत.
यावेळी बोलताना समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर म्हणाले,संघटना ही शिक्षक प्रश्नाबरोबर विद्यार्थी हितासाठी धडापडत असतें.. केंद्रप्रमुख प्रमोशन घेताना शिक्षक समितीने महत्वाची भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले.
या सभेच्या प्रसंगी शिक्षक समितीच्या नूतन पदाधिकारीच्या निवडी करण्यात आल्या.
धनाजी दगडू पाटील – जिल्हा उपाध्यक्ष
चंद्रकांत नारायण पाटील – जिल्हा उपाध्यक्ष
धनाजी सासने – कार्यालयीन चिटणीस
सुकुमार मानकर – जिल्हा संपर्क प्रमुख
आदी पदे जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.
सभेस पुणे विभाग अध्यक्ष अर्जुन पाटील, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष रामदास झेंडे, शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, बाबुराव परीट, शिवाजी बोलके सर,जि प कर्मचारी सोसायटी चे संचालक बाजीराव पाटील,कार्याध्यक्ष गणपती मांडवकर, कोशाध्यक्ष सुनिल कुंभार, महिला जिल्हाध्यक्षा संगीता अस्वले, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस शुभांगी माळी,जिल्हा उपाध्यक्ष संजय कुंभार, सर्जेराव पोवार विभागीय अध्यक्ष, किरण सुतार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,बालाजी पांढरे,बाबा धुमाळ,धनाजी पाटील,जिल्हातून सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस व शिक्षक समिती चे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी –
(शिक्षक समितीच्या वतीने नूतन विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख जिल्हा कार्यकारणीच्या सभेत सत्कार करताना समितीचे अर्जुन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुंभार,रामदास झेंडे, सुरेश कोळी ,बाबुराव परीट, शिवाजी बोलके, बाजीराव पाटील,प्रमोद तौदकर, प्रभाकर कमळकर आदी.)










