‘पुरोगामी’ शहर शिक्षक संघटनेच्या वतीने शिष्यवृत्ती गुणवंत, मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळासंपन्न
विचारांची सकारात्मकता ही कृतीची गुरुकिल्ली आहे- विठ्ठल कोतेकर
‘पुरोगामी’ शिक्षक संघटनेच्या वतीने शिष्यवृत्ती गुणवंत, मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा
कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शहर शखेच्या वतीने शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरचे शिवराज नाईकवाडे होते .कोतेकर पुढे असेही म्हणाले की . स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवण्यासाठी आपले विचार हे सकारात्मक ठेवावे . प्राप्त परिस्थितीतही स्वतःला ऊर्जा देणाऱ्या गोष्टी पुस्तके आणि व्यक्ती यांच्या सहवासात राहावे ,,
इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीमध्ये राज्य , जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक , मुख्याध्यापक , प्राथमिक शिक्षण समितीकडील जाहीर झालेले आदर्श शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , नवनियुक्त शिक्षक यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले .राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ पुष्पा गायकवाड यांचा विशेष सत्कार यावेळेस करण्यात आला .
यावेळी शिवराज नाईकवाडे म्हणाले की पुरोगामी शिक्षक संघटना मुलांना ऊर्जा देण्याचे काम करते , कोल्हापूरचे नाव साऱ्या राज्यभर गाजवण्यात महापालिकेचे शिक्षक सदैव प्रयत्नशील असतात .त्यामुळेच गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान त्यांना मिळतो..
प्राथमिक शिक्षण समितीचे माजी उपसभापती अशोक पोवार यांनीही महापालिकेच्या शिक्षकांमुळेच महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था आली आहे असे आपल्या मनोगतात म्हटले .
यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना उद्बोधित केले .
कार्यक्रमात गरीब होतकरू आणि कोरोना काळात आई , वडील गमावलेल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप संघटनेच्या वतीने करण्यात आले .
या सत्कार सोहळ्यास शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे , विजय माळी ,पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील , जिल्हाध्यक्ष एस के पाटील , सरचिटणीस शंकर पोवार, शहर सरचिटणीस , द्रोणाचार्य पाटील ,राज्य नेते आनंदा पाटील , महिला कार्याध्यक्ष सुजाता पोवार , महिला सरचिटणीस स्मिता कारेकर , कोमनपा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापती मनीषा पांचाळ , संघटनेचे पदाधिकारी शिक्षक , विद्यार्थी पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी केले . सूत्रसंचालन आर जी कीर्तिकर सर यांनी तर आभार शिवशंभु गाटे यांनी मानले .
(फोटो ओळी-)–
महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शहर शाखेच्या वतीने शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक यांचा गौरव करताना पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील ,जिल्हाध्यक्ष एस के पाटील , सरचिटणीस शंकर पोवार,विलास पिंगळे, शहर सरचिटणीस , द्रोणाचार्य पाटील ,राज्य नेते आनंदा पाटील , महिला कार्याध्यक्ष सुजाता पोवार , महिला सरचिटणीस स्मिता कारेकर, मनीषा पांचाळ,शिक्षक व विद्यार्थी आदी.










