March 24, 2026

फुलेवाडी वर्षावास धम्म परिषदेत उद्या पुरोगामी विचारांचा जागर!

0
IMG-20241019-WA0065(1)

फुलेवाडी वर्षावास धम्म परिषदेत उद्या पुरोगामी विचारांचा जागर!

बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर/मारुती फाळके

फुलेवाडी येथे उद्या वर्षावास धम्म परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक विजय कांबळे,गौतम वर्धन,संजय कुर्डुकर,तानाजी घरपणकर यांनी दिली.गेली ४ वर्षे अखंडपणे विजय कुशान शित्तूरकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या वर्षावास धम्म परिषदेत सर्वांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना विजय कांबळे म्हणाले,
अनिष्ट रूढी, परंपरा, आणि गुलामीच्या बेड्या तोडून बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना
१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा दिली.
बाबासाहेब म्हणाले होते,माझ्या पश्चात धम्मच तुम्हाला तारू शकतो,भारत बौद्धमय करणे हे माझे स्वप्न होते.अशा महामानवाच्या संदेशाची जपणूक करणे., प्रसार प्रचार करणे ही आजची काळाची गरज आहे.
आणि हीच गरज ओळखून
कोल्हापूर सारख्या शहरात खूप मोठं आव्हान स्वीकारून कोल्हापूर आणि उपनगरीय परिसरात
धम्माचा प्रसार आणि प्रचारा च काम विजय कुशान शीत्तूरकर, संजय कदम, संजय कुर्डुकर, गौतम वर्धन , बौद्ध धम्म,पाली भाषा अभ्यासक अमित मेधावी, तानाजी घरपणकर, काळे सर,पी डी सरदेसाई, जगदीश सर, तुकाराम संघवी, दयानंद म्हेत्तर आदींच्या नेटक्या,सक्रिय संयोजनातून धम्म परिषद संपन्न होत आहे.

असंख्य धम्म अनुयायांच्या अथक प्रेरणा मुळे गेली ३ वर्षे भव्य धम्म परिषद होत असते. याही वर्षी
भव्य धम्म वर्षावास
साजरा होतोय.
या कार्यक्रमात प्रा. विजय काळेबाग, सोलापूर चे प्रा सिद्धार्थ शिनगारे , बौद्ध धम्माचे,पाली भाषेचे अभ्यासक,लेखक, विचारवंत अमित मेधावी यांच्या प्रबोधनात्मक विचारांचा लाभ मिळणार आहे.
शिवाय कर्जत येथील सुप्रसिद्ध धम्मदेसनाकर भन्ते सिरीसरो यांची बुद्ध वाणी ऐकायला मिळणार आहे., असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास खा. शाहू महाराज,कास्ट्राइब महासचिव नामदेवराव कांबळे, प्रा.बी एस काळे, डॉ.अनिल माने, राज्य कब्बड्डी पंच कृष्णात माने, मा. संतोष समुद्रे इ. ची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

उद्या या धम्म परिषदेसाठी सर्व धर्मातील पुरोगामी,बुद्धिस्ट, आंबेडकरवादी, विज्ञानवादी विचारसरणीच्या वर्षावास धम्म परिषदेसाठी बहुसंख्येने सकाळी १० वा. बालिंगा रोडवरील वसंत हरी मल्टिपर्पज हॉल फुलेवाडी कोल्हापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या धम्म परिषदेचे
उद्घाटन – खासदार छ. शाहू महाराज
प्रमुख उपस्थिती भन्ते सिरिसारो,
अध्यक्ष – डॉ. विजय काळेबाग
स्वागताध्यक्ष – आयु. संजय कुडूकर,ध्वजारोहक आयु. तानाजी घरपणकर तसेच
धम्म देसनाकार आयु. सिध्दार्थ शिनगारे, आयु. अमित मेधावी या बौद्धविचारवंत,अभ्यासकांचे अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ अनुयायांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!