फ्री विंग्ज फाउंडेशनने वंचितांच्या जीवनात पेटवली ज्योत
फ्री विंग्ज फाउंडेशनने
वंचितांच्या जीवनात पेटवली ज्योत
नव्या कपड्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद तर मान्यवर झाले भावूक
उजळाईवाडी/मारुती फाळके
फ्री विंग्ज फाउंडेशन, कोल्हापूर वंचितांच्या जीवनात माणुसकीची ज्योत प्रज्वलित केली आहे. पितृक्षत्र हरवलेल्या बालकांसाठी एक दिवा माणूसकीचा या कार्यक्रमातून उपस्थितांची मने हेलावून गेली. यावेळी
भावूक वातावरण झाले होते. भेटवस्तूनी मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता.
उजळाईवाडी (ता. करवीर )येथील समर्थ मंगल कार्यालय येथे उजळाईवाडी प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या उपक्रम शील शिक्षकांच्या संकल्पनेतून
फ्री विंग्ज फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या मदतीतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक संयोगिता महाजन म्हणाल्या की,फ्री विंग्ज फाउंडेशन समाजभान जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे.विशेष म्हणजे या फाउंडेशनच्या संचालिका या उपक्रमशील शिक्षक आहेत. मुलांना नेहमी आनंददायी तसेच माणुसकीचे शिक्षण देण्यासाठी त्या आग्रही असतात.संयोगिता महाजन व रोहिणी शिंदे यांच्या कल्पनेतून असे विविध कार्यक्रम मूल्य शिक्षण विषयक कार्यक्रम घेतले जात आहेत.
एक दिवा माणूसकीचा या अंतर्गत आली माझ्या घरी ही दिवाळी उपक्रम घेण्यात आला.या उपक्रमामध्ये आई किंवा वडील यांचे छत्र हरवले आहे. अशा मुलांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. एकूण १७ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे कपडे ,फराळाचे साहित्य ,फटाके पणत्या, तेल ,उटणे साबण असे साहित्य देण्यात आले. आई किंवा वडील यांचे छत्र हरवलेल्या मुलांना आम्ही तुमच्यासोबत आहोत. सणाचा आनंद द्विगणित करून भविष्यात अशा अनेक विद्यार्थ्यांना मुलांना उभारी देण्यासाठी प्रयत्न व्हावा या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात फ्री विंग्ज फाउंडेशन गेले सात वर्ष सातत्याने असे उपक्रम राबवित आहे.
उपक्रमात मुलांचे औक्षण करून त्यांच्यासाठी विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व मुलांना आपल्या उत्पन्नातील काही वाटा भविष्यात समाजासाठी उपयोगी ठेवावा यासाठी नाविन्यपूर्णरित्या शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन फ्री विंग्जच्या संचालिका संयोगिता महाजन, रोहिणी शिंदे, स्नेहा लोखंडे, उषा तळप,संगीता चांदणे, राधिका कालेकर.
यांनी केले. समाजातील दातृत्ववान लोकांनी यासाठी मदत केली. या कार्यक्रमास विविध स्तरातून मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित
भावूक झाले होते. या कार्यक्रमास उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, ग्रामपंचायत सदस्य चंदा माने, सारिका माने ,भाग्यश्री पारखे सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा यादव, अर्चना पंडित, पूजा स्वामी ,राधिका कालेकर ,उद्योजक दिग्विजय खोत, युवा
संस्थेचे एच.आय व्ही /एड्स जनजागृतीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते,
उपक्रमशील शिक्षक मारुती फाळके, संजय वर्धन व उपस्थितीत होते.प्रास्ताविक संगीता चांदणे यांनी केले. स्नेहा लोखंडे यांनी आभार मानले.
(फोटो ओळ):उजळाईवाडी येथे उजळाईवाडी प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या उपक्रम शील शिक्षकांच्या संकल्पनेतून फ्री विंग्ज फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या मदतीतून एक दिवा माणुसकीचां या उपक्रमातून वंचित मुलांची दिवाळी गोड या कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवर.










