March 24, 2026

करवीर पतसंस्थेमार्फ़त कारपेट, सनफ्लॉवर दीपावली भेट

0
IMG-20241028-WA0051

दीपावलीनिमित्त ८.५ टक्के दराने ३ लाखांचे कर्ज, करवीर शिक्षक पतसंस्थेची योजना : कारपेट, सनफ्लॉवर तेल वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था व सभासदांभिमुख कारभाराने शिक्षकांच्या मनात आदर्श वस्तुपाठ निर्माण केलेली करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांसाठी दीपावलीनिमित्त अवघ्या साडेआठ टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत कर्ज योजना राबवली आहे. तसेच शेअर्सवर ६ टक्के रोख रक्कम, ६ बाय ९ चे कारपेट व ५ लिटर सनफ्लॉवर तेल भेटवस्तू म्हणून वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक आनंदराव शिंदे होते.

 

कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक व शिक्षक नेते कृष्णात कारंडे, संचालक सुरेश कोळी, वर्षा केनवडे, दीपाली भोईटे,
शरद केनवडे, बाबा धुमाळ, सुकुमार मानकर, धनाजी सासणे, बाळासाहेब कांबळे, धनाजी पाटील, शशिकांत धुत्रे, राजेंद्र तौंदकर, चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम, प्रताप पाटील, दीपक पाटील, गीता कोळी, अजित खाडे, संतोष गायकवाड, संगीता अलगौंडर-दिवटे, प्रसन्नजित कारंडे व ओंकार वातकर यांच्यासह सुकाणु समिती, सल्लागार मंडळ व सभासद उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन यशवंत चौगले, तर आभार व्हा. चेअरमन सचिन पावसकर यांनी मानले. सूत्रसंचालन व्यवस्थापक संदीप शिंदे यांनी केले.

फोटो ओळी-
करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावलीनिमित्त भेटवस्तू वाटप शिक्षक नेते कृष्णात कारंडे, सुरेश कोळी,वर्षा केनवडे,दीपाली भोईटे,शरद केनवडे, बाबा धुमाळ, सुकुमार मानकर,धनाजी सासणे, बाळासाहेब कांबळे,धनाजी पाटील, शशिकांत धुत्रे, राजेंद्र तौंदकर, चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम, व सर्व संचालक मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!