March 24, 2026

प्राथमिक शिक्षकांचे वेतन अनुदान वेळेत द्या- राजाराम वरुटे

0
IMG-20241125-WA0032

प्राथमिक शिक्षकांचे वेतन अनुदान वेळेत द्या- राजाराम वरुटे

शिक्षक संघाची शिक्षण संचालकाकडे मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झालेल्या शिक्षकांचे अनुदान वेळेत उपलब्ध होण्यासाठी मार्ग काढावा आणि लवकरात लवकर जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन जिल्हा परिषदेला वर्ग करावे,या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांनी आज शिक्षण संचालक शरद गोसावी यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

शरद गोसावी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत व्हावे तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झालेल्या शिक्षकांच्या फरकासाठी अनुदान देणेत यावे यासाठी मा. शरद गोसावी साहेब, शिक्षण संचालक प्राथमिक, पुणे यांना निवेदन देवून प्रदिर्घ चर्चा करणेत आली.
यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण सचालक यांनी वेतन अनुदान व फरक अनुदान वेळेत देणेसाठी प्रयत्नशील आहे. असे आश्वासन शिक्षक संघाला दिले
यावेळी शिक्षक संघाचे गगनबावडा तालुका सरचिटणीस श्रीपती तेली, तालुका संघाचे उपाध्यक्ष संजय देसाई उपस्थित होते.

   (फोटो ओळी-प्राथमिक शिक्षकांच्या वेतन अनुदानाबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे बाबत चर्चा करताना राजाराम वरुटे,श्रीपती तेली आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!