March 24, 2026

२८ नोव्हेंबर ला ‘कास्ट्राईब’ च्या वतीने ‘अमृतमहोत्सवी संविधान दिन’ व ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण सोहळा- गौतम वर्धन

0
IMG-20241126-WA0038(1)

२८ नोव्हेंबर ला ‘कास्ट्राईब’ च्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिन व र आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
गौतम वर्धन याची माहिती

कोल्हापूर/मारुती फाळके

कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेच्याच्या वतीने २८ नोव्हेंबर ला अमृत महोत्सवी संविधान दिन व राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन व सरचिटणीस संजय कुर्डुकर यांनी दिली.
शाहू स्मारक सभागृह येथे सकाळी १० वा. पासून संविधान रॅलीने या कार्यक्रमाची सुरवात होईल.

अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान रॅलीचे आयोजन १० वा. करण्यात आले असून ही रॅली शाहू स्मारक दसरा चौकातून निघेल. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा व सामाजिक कार्याचा विचार पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.महात्मा जोतिबा फुले यांचा पुण्यदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा संघटनेने चालू केली आहे.गेली १२ वर्षे हा कार्यक्रम संघटनेमार्फत घेतला जात आहे . महामानवांच्या विचारांचा जागर समाजापुढे सातत्याने होण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे .

याही वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात एका आदर्श शिक्षकाची निवड करून त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे तसेच सांगली , सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग याही जिल्ह्यातील शिक्षकांना प्रातिनिधीक स्वरूपात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे नेते नामदेवरावजी कांबळे, कार्यक्रमाचे उद्घाटक कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सचिन साळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर , संभाजी पोवार समाजकल्याण अधिकारी जि. प. कोल्हापूर , सौ.मीना शेंडकर शिक्षणाधिकारी प्राथमिक , डॉ. एकनाथ आंबोकर माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर , संघटनेचे राज्यअध्यक्ष आकाश तांबे , राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे , समरजीत पाटील गटशिक्षणाधिकारी प.स. करवीर,शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर, व्हा.चेअरमन रामदास झेंडे व जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन सुधाकर कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात राष्ट्रपिता जोतीराव फुले शैक्षणिक सामाजिक कार्य व भारतीय संविधान या विषयावर प्रा.डॉ. एस.एस. महाजन -अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्र शिवाजी विद्यापीठ यांचेही व्याख्यान होणार आहे.तरी कार्यक्रमास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!