कास्ट्राईब’ च्या वतीने १९ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार
‘कास्ट्राईब’ च्या वतीने १९ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार
२८ नोव्हेंबर ला मान्यवरांच्या हस्ते वितरण
कोल्हापूर/मारुती फाळके
२८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन मानून गेली १२ वर्षे अव्याहतपणे समाजात समर्पण भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर थाप देण्याचे काम कास्ट्राईब शिक्षक संघटना करत आहे.या दिनाचे औचित्य साधून कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील १९ जणांना
महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने देणार असल्याचे माहिती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन व सरचिटणीस संजय कुर्डुकर यांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई यांनी बहुजनांच्या शिक्षणाची सुरुवात केली.अथक परिश्रमातून संघटनेने हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवलेली आहे .
हा कार्यक्रम दरवर्षी विभागीय स्तरावर आयोजित केला जातो.
भविष्यामध्ये या कार्यक्रमाचे स्वरूप राज्यस्तरावर केले जाईल असे संयोजकांनी सांगितले.
यावर्षीचा कार्यक्रम म्हणजे अमृत महोत्सवी संविधान दिन म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे प्रभावी नियोजन सुरू आहे.
कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटना परिवार जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा फुले गुणवंत पुरस्कारप्राप्त शिक्षक-
१. करवीर -शहाजी पांडुरंग शिंदे विषयशिक्षक – वि. म. येवती,
२.सौ. अस्मिता पाटील अध्यापिका कुमार विद्यामंदिर पाडळी खुर्द
३.कागल
* भाग्येश कांबळे
* जीवन शिक्षण विद्यामंदिर रणदेवीवाडी
* ४.भुदरगड
* प्रवीण कांबळे
* वि. म. सीमालवाडी
*५. गडहिंग्लज
मधुकर कामडे
-वि.म. लिंगनूर *
6पन्हाळा – श्रीमती आशा चव्हाण केंद्र शाळा आसुर्ले
*7 हातकणंगले -* शशिकांत खांडेकर
वि म आलाटवाडी
*
8 राधानगरी
– सौ शीतल कांबळे
वि.म. दुर्गमानवाड गावठाण
९. शाहुवाडी – तौसीफ पटेल वि.म. गिरगाव धनगरवाडा
. १०.आजरा
– श्रीमती प्रज्ञा राजदीप अध्यापिका विद्यामंदिर कासार कांडगाव *
११.चंदगड –
नारायण सामंत मुख्याध्यापक कु वि मं नागरदळे
*१२. गगनबावडा –
* नंदकुमार बावेलीकर -अध्यापक बावेली हरिजन वाडा
१३. शिरोळ -* दयानंद शामराव दीपंकर – मुख्याध्यापक केंद्रीय शाळा नांदणी *
१४. पन्हाळा –
प्रशांत शिंगे
हॉवर्ड मेमो हायस्कूल कोडोली
१५.
सांगली – प्रमोद काकडे- सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी तालुका पलूस
१६. सातारा –
प्रशांत मोरे, – जि. प. प्राथमिक शाळा पवळेश्वरनगर ता. जिल्हा सातारा
*१७. रत्नागिरी*
– प्रदीप वाघोदे -प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड
१८. संजय मोरे – शिवाजी माध्यमिक विद्यालय .
१९.
सिंधुदुर्ग
सुधीर तांबे – मुख्याध्यापक सरस्वती हायस्कूल नांदगाव ता./ जि सिंधुदुर्ग.










