कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या”च्या वतीने संविधान पुस्तिकेचे वाटप
कास्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगलेच्या”च्या वतीने संविधान पुस्तिकेचे वाटप
तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षण विभागात संविधान पुस्तिका वितरण
कोल्हापूर/प्रतिनिधी
संविधान दिनाचे औचित्य साधून गट साधन केंद्र पंचायत समिती हातकणंगले येथे “कास्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगले शाखा परिवाराच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग व हातकणंगले तालुक्यातील सर्व केंद्रांना “भारतीय संविधान” या महान लोकशाही ग्रंथाचे वाटप करण्यात आले.शिक्षण विभाग पंचायत समिती तील गट साधन केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला.यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना संविधान पुस्तिका देण्यात आल्या.
यावेळी बोलताना विजय कांबळे म्हणाले, संगणक साक्षरता जशी काळाची गरज आहे त्याप्रमाणे संविधान साक्षरता लोकशाही भक्कम करण्यासाठी काळाची गरज आहे.शाळाशाळात विद्यार्थ्यांचात संविधान जागृती साठी भारतीय संविधानाचे वाचन होणे आवश्यक आहे.संविधान वाचल्यामुळे देशाचा आदर्श नागरिक घडणार आहे.
यावेळी शिक्षक मारुती फाळके यांनी आपल्या सुरेल आवाजात संविधान प्रास्ताविकेचे गायन करून सुधारित आवृत्ती संविधानाबाबद्दल माहिती दिली.
प्रास्ताविक विजय कांबळे, तर आभार सुरेश जाधव यांनी मानले
कार्यक्रमास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले, विस्तारअधिकारी अजयकुमार बिरणगे, जे टी पाटील,नम्रता गुरसाळे, गुलाब गंजीले,एन जे पाटील,अर्जुन पाटील, एन वाय पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, जिल्हा नेते सुरेश जाधव,जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे, केंद्रप्रमुख कृष्णात पाटील,भूपाल मंडगे,अशोल भुजवडकर,महादेव गायकवाड,पोपट पाटील,शीतल हारवले,शहाजी पाटील,शशिकांत पाटील,माणिक कागवाडे, भारत पाटील,इम्तियाज म्हैशाळे,विशाल देसाई,विषयतज्ज्ञ,समूह साधन केंद्राच्या प्रमुख पूजा कांबळे, आबाजी कांबळे, स्वाती कांबळे, कल्पना लोंढे,वैशाली माने,विकास पन्हाळे,प्रवीण साळुंखे,वाळके, अमोल कुंभार,रुपाली कांबळे आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी- कास्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगले शाखा परिवाराच्यावतीने भारतीय संविधान वितरित करताना तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, जिल्हा नेते सुरेश जाधव,जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे, स्वीकारताना गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले,जे टी पाटील, अजयकुमार बिरणगे, गुलाब गंजीले, नम्रता गुरसाळे,विशाल देसाई,केंद्रप्रमुख कृष्णात पाटील,भूपाल मंडगे,अशोल भुजवडकर,महादेव गायकवाड आदी.)










