March 24, 2026

शिक्षक घडवण्याचा संस्कार महात्मा फुले च्या तत्वज्ञानात-डॉ.एस.एस.महाजन “कास्ट्राईब शिक्षक”चे क्रांतीबा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

0
IMG-20241128-WA0038(1)

शिक्षक घडवण्याचा संस्कार महात्मा फुले च्या तत्वज्ञानात-डॉ.एस.एस.महाजन

“कास्ट्राईब शिक्षक”चे क्रांतीबा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

म.फुले स्मृतिदिन विशेष

कोल्हापूर/मारुती फाळके

शिक्षक घडवण्याचा संस्कार महात्मा फुलेच्या तत्त्वज्ञानात असून समाजाला परिवर्तनाकडे नेण्याची क्षमता केवळ शिक्षकांच्यात आहे. शिक्षकांचा सत्कार होणे हा महात्मा फुलेंचा विचार कास्ट्राईब शिक्षक संघटना जगत आहे, येणाऱ्या काळात शिक्षक या पेशाची जबाबदारी वाढली आहे असे मत शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस.एस. महाजन यांनी केले.
ते कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिन व क्रांतीबा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

महाजन म्हणाले, महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानात उदात्त मानवतावादाचे दर्शन घडते. फुलेंचे सामाजिक कार्य नव्या पिढीने समजून घ्यायला हवे. फुलेच्या विचारकार्याचा वारसा हा जगण्याचा मूलाधार आहे. आज शिक्षणाने जो समाज प्रगतीपथावर आहे याचे सर्वस्वी श्रेय हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समर्पणकार्याला द्यावे लागेल.

अध्यक्षस्थाना वरून बोलताना नामदेवराव कांबळे म्हणाले, समाजातील वंचित, शोषित घटकासाठी कास्ट्राईब संघटना सातत्याने समाजप्रबोधनाचे काम करत असून शिक्षकांच्या पाठीवर थाप ठेवण्याचे काम पंधरा वर्षे सातत्याने करत आहे. संघटना महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरवात सकाळी १० दसरा चौक येथून शाहु महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अमृतमहोत्सवी संविधान रॅलीने झाली.

यावेळी १९ गुणिजनांना क्रांतीबा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, गौरवचिन्ह, संविधान प्रत,वैचारिक ग्रंथ असे होते.

यावेळी प्रास्तविकपर भाषणात  बोलताना शिक्षक बँकेचे संचालक,संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन म्हणाले,राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिराव फुले व क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा व सामाजिक कार्याचा विचार पुढे नेण्याच्या भावनेतून महात्मा जोतिबा फुले यांचा पुण्यदिन शिक्षक दिन म्हणून गेली १५ वर्षे हा कार्यक्रम संघटनेमार्फत घेतला जात आहे . महामानवांच्या विचारांचा जागर समाजापुढे सातत्याने होण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.या वर्षी अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त शहरातून संविधान रथ रॅली काढून समाजप्रबोधन करण्याचा वेगळा उपक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी तर स्वागत सरचिटणीस संजय कुर्डूकर,सूत्रसंचालन वैभव प्रधान,आभार जिल्हा उपाध्यक्ष  विजय कांबळे- चोकाककर यांनी मानले.

कार्यक्रमास करवीर चे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे , राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे,प्रदीप वाघोदे,प्रशांत मोरे,प्रमोद काकडे,शिक्षक बँकेचे संचालक अर्जुन पाटील, अमर वरुटे, शिवाजी रोडे पाटील,गजानन कांबळे, विलास चौगुले, संजय दाभाडे, शिवाजी ठोंबरे,आकाराम कांबळे,बाजीराव प्रज्ञावंत,तुकाराम संघवी,पी डी सरदेसाई,सुखदेव कदम,विजय कांबळे, दिलीप कांबळे, ए ल कांबळे,बी एस कांबळे, तानाजी घस्ते, दयानंद म्हेत्तर,प्रकाश धातूंडे, संगीता अस्वले,हेमलता कुर्डुकर,छाया वर्धन व जिल्हा परिषद कर्मचारीचे चेअरमन सुधाकर कांबळे,सुखदेव कदम, अशोक कांबळे, विजय कुशान, विजय कांबळे- चोकाककर, दयानंद म्हेतर, संजीवनी कांबळे,विद्या कांबळे, अनिता कदम, शुभांगी खडतरे, अस्मिता साबळे, सुनंदा जगदीश,स्मिता कांबळे, बी.एस कांबळे,, सर्जेराव काळे, के.एस माने, विजय गायकवाड, गणपत गायकवाड ,दिनकर जगदीश, सुरेश कदम, बाजीराव जाधव ,एम एस कांबळे ,विनायक प्रधान, सजीव कांबळे ,सुरेश जाधव ,विलास जाधव, डि.के. कांबळे, मनीष कांबळे ,सुरेश देशमुख, नागेश सुतार ,जी के कांबळे, बाबासो सोरटे,सदाशिव कांबळे, संजय कांबळे,विजय कांबळे -चोकाककर,दिलीप कांबळे, जे.के. कांबळे,दयानंद दीपंकर, रमेश कांबळे,बी वाय कांबळे,बी एस कांबळे, भीमराव तराळ, मधुकर जरळी, विजय कांबळे, रामचंद्र कांबळे,राजेंद्र कांबळे, सिद्धार्थ कांबळे,जयेंद्र लाटणे, सुहास कदम, प्रशांत जयकर,नंदकुमार कांबळे,अमित कांबळे, राम घोलप,आदी उपस्थित होते.

चौकट-१.

फुले- शाहू- आंबेडकर

मागास,शोषित समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण असले पाहिजे ही कल्पना सुरवातीला महात्मा फुलेनी मांडली, त्याची कृती प्रत्यक्ष शाहू महाराजांनी केली. त्या आरक्षणाची संहिता संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात मांडली. म्हणूनच फुले- शाहू -आंबेडकर ही एकत्र नाव घेतली जातात,त्यामागे विचारांचा आणि प्रत्यक्ष कृतीचा हा इतिहास आहे असे ते म्हणाले.

चौकट २.-

गव्ह.ऑफ इंडिया
भारतीय संविधानाने देशाचा राज्यकारभार करत असलेले सरकार हे कोणत्याही पक्षाचे नसून संख्याबळ हे त्या पक्षाचे असते.पण सावंधानिक नियमानुसार सरकार हे “भारत सरकार” म्हणून संबोधले जाते, असे त्यांनी संविधानातील अनुसूचीनुसार सांगितले.

फोटो ओळी-

कोल्हापूर : महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षका समवेत,नामदेवराव कांबळे, प्रा.डॉ.एस.एस महाजन,समाजकल्याण अधीक्षक सचिन पाटील, आकाश तांबे, प्रदीप वाघोदे, बाजीराव प्रज्ञावंत, प्रशांत मोरे, गौतम वर्धन,संजय कुर्डूकर पी.डी. सरदेसाई,विजय कांबळे, यशवंत सरदेसाई आदी मान्यवर.

महात्मा फुले गुणवंत आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक-
१. करवीर -शहाजी शिंदे विषयशिक्षक – वि. म. येवती,
२.सौ. अस्मिता पाटील अध्यापिका कुमार विद्यामंदिर पाडळी खुर्द

३.कागल
* भाग्येश कांबळे
* जीवन शिक्षण विद्यामंदिर रणदेवीवाडी

* ४.भुदरगड
* प्रवीण कांबळे
* वि. म. सीमालवाडी

५. गडहिंग्लज
मधुकर कामडे
-वि.म. लिंगनूर

६.पन्हाळा – श्रीमती आशा चव्हाण केंद्र शाळा आसुर्ले

७.हातकणंगले- शशिकांत खांडेकर
वि म आलाटवाडी
८. राधानगरी

– सौ शीतल कांबळे

वि.म. दुर्गमानवाड गावठाण

९. शाहुवाडी – तौसीफ पटेल वि.म. गिरगाव धनगरवाडा
१०.आजरा
– श्रीमती प्रज्ञा राजदीप अध्यापिका विद्यामंदिर कासार कांडगाव

११.चंदगड –

नारायण सामंत मुख्याध्यापक कु वि मं नागरदळे

१२. गगनबावडा –

* नंदकुमार बावेलीकर -अध्यापक बावेली हरिजन वाडा

१३. शिरोळ – दयानंद दीपंकर – मुख्याध्यापक केंद्रीय शाळा नांदणी

१४. पन्हाळा –
प्रशांत शिंगे
हॉवर्ड मेमो हायस्कूल कोडोली
१५.
सांगली – प्रमोद काकडे- सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी तालुका पलूस

१६. सातारा –
प्रशांत मोरे, – जि. प. प्राथमिक शाळा पवळेश्वरनगर ता. जिल्हा सातारा
१७. रत्नागिरी
– प्रदीप वाघोदे -प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड
१८. संजय मोरे – शिवाजी माध्यमिक विद्यालय .
१९.
सिंधुदुर्ग
सुधीर तांबे – मुख्याध्यापक सरस्वती हायस्कूल नांदगाव ता./ जि सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!